लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळता वर्ग तीन आणि चारमधील कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशनाद्वारे गत चार दिवसांपासून सुरू आहे. बदली प्रक्रियेच्या शुक्रवार १३ मे या अखेरच्या दिवशी सिंचन व आरोग्य विभागातील ५२ कर्मचाऱ्यांच्या अशा चार दिवसांत २३० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. १३ मे रोजीच्या बदली प्रक्रियेत सिंचन विभागातील प्रशासकीय बदलीने मेळघाटातून गैरआदिवासी भागात १ आणि प्रशासकीय बदलीने गैरआदिवासी भागातून मेळघाटात १, सर्वसाधारण क्षेत्रात विनंतीने २ अशा ४ जलसंधारण अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आरोग्य सेविकेच्या मेळघाटमधून प्रशासकीय बदलीने गैरआदिवासी भागात ७, आरोग्य साहाय्यिका १, आरोग्य पर्यवेक्षक १, औषध निर्माण अधिकारी २, याप्रमाणे १२ मेळघाटमधून विनंती बदलीने गैरआदिवासी क्षेत्रात आरोग्य सेविका ५, आरोग्य साहाय्यिका १, आराेग्य साहाय्यक पुरुष २, औषध निर्माण अधिकारी १ अशा ९ बदल्या केल्या आहेत. यासोबतच गैरआदिवासी भागातून मेळघाटात विनंती बदलीने ३, सर्वसाधारण क्षेत्रात विनंती बदलीने ८ आणि आपसी बदलीने २ आरोग्य विभागांतील ४८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यावेळी सीईओ अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, डीएचओ डॉ. दिलीप रणमले, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनील जाधव उपस्थित होते.