लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भरधाव वाहनाची जोरदार धडक बसल्यानंतरही जखमींना वाचविण्यासाठी चालकाने आपले चुराडा झालेले वाहन इर्विन रुग्णालयापर्यंत पोहचविले. शुक्रवारी पहाटे ४ वाजता नवसारीजवळील राजपूत धाब्याजवळ घडलेल्या या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे.पोलीस सूत्रानुसार, राजिक खान बिस्मिल्ला खान (२६, रा.नेरपिंगळाई) असे मृताचे नाव आहे. त्याचा मोठा भाऊ शेख रफीक शेख कुद्रुस गंभीर जखमी झाला. या अपघातात चालक शेख अमिर शेख उद्रुस (२४, रा. यास्मीननगर) हासुद्धा किरकोळ जखमी झाला. मृत राजिक व त्याचा मोठा भाऊ शेख रफीक हे दोघेही एमएच २७ एफझेड २६५१ क्रमांकाच्या कारने नागपूरकडे जात होते. चालक शेख अमिर हा वाहन चालवित होता. राजपुत धाब्याजवळ कारला मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. धडकेत कारच्या एका बाजूचा चुराडा झाला. टायरच्या चिंधड्या उडाल्या होत्या. पहाटेची वेळ असल्यामुळे चालकाला कोणाचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यानेच मालकांचा जीव वाचविण्यासाठी ती अपघातग्रस्त कार इर्विन रुग्णालयापर्यंत आणली. तेथून कारमधील जखमींना उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी राजिक खानला मृत घोषित करण्यात आले. शेख अमिर याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८, १८४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
अपघातग्रस्त वाहन घेऊन चालक पोहोचला इर्विनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:45 PM
भरधाव वाहनाची जोरदार धडक बसल्यानंतरही जखमींना वाचविण्यासाठी चालकाने आपले चुराडा झालेले वाहन इर्विन रुग्णालयापर्यंत पोहचविले. शुक्रवारी पहाटे ४ वाजता नवसारीजवळील राजपूत धाब्याजवळ घडलेल्या या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे.
ठळक मुद्देएक ठार, एक गंभीर : राजपूत धाब्याजवळ घटना