अमरावती : महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आयसोलेशन दवाखाना दसरा मैदान व विलासनगर शाळा क्र.१७ या आरटी-पीसीआर व अँटीजेन टेस्ट सेंटरची पाहणी केली. येथे येणाऱ्या व्यक्तींना सुविधा उपलब्ध झाली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. या सेंटरमुळे नमुने तपासणीची प्रक्रिया गतिमान झाल्याचे ते म्हणाले.
विलासनगरातील शाळेची पाहणी आयुक्तांनी केली. सेंटरला आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी तेथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. अँटिजेन चाचणीमुळे १५ ते २० मिनिटांत निदान केले जाते तसेच चाचणी नकारात्मक असल्यास आररटीपीसीआर करणे महत्त्वाचे आहे. पॉझिटिव्ह अहवाल लवकर मिळाल्यामुळे संबंधित रुग्णाला त्वारेने वैद्यकीय उपचार मिळत आहे. या सेंटरवर येणाऱ्या बाधित व्यक्तींना योग्य अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले.
महापालिका कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्णांचे रहिवासी विभागात तयार केलेल्या कंटेन्मेंट झोन किंवा हॉटस्पॉट क्षेत्रात शहरी आरोग्य केंद्रामार्फत घरोघरी करण्यात येणाऱ्या दैनंदिन सर्वेक्षणांतर्गत आढळून येणारे एस.ए.आर.आय./आय.एल.आय. रुग्ण आढळून आल्यास त्यांची कोरोना चाचणी करणे अपेक्षित आहे. ज्या रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह येईल, त्या व्यक्तीला असलेल्या लक्षणांनुसार कोरोना केअर सेंटर, कोरोना हेल्थ सेंटर कोव्हीड हॉस्पिटलमध्ये संदर्भीय करण्यात येईल.
बॉक्स
नियमांचे पालन करा, नागरिकांना सुचना
ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वसनाचा त्रास असल्यास, वृध्द व दिव्यांग व्यक्तींना काही त्रास असल्यास, कोणतेही व्यक्ती कोव्हीड-१९ च्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती शहरी आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यानी द्यावी व नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देत सुरक्षित राहावे तसेच परिसरातील नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन कराण्याच्या सुचना आयुक्तांनी दिल्या.