लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथील दलित वस्तीतील बोअरवेल पाणी पुरवठा मागील अडीच वर्षापासून नादुरूस्त आहे. मात्र, या विषयाकडे कार्यकारी अभियंता प्रकल्प बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरीकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची बाब सदस्य गौरी देशमुख यांनी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या सभेत हा मुद्दा रेटून धरताना प्रशासनाला निरुत्तर केले.याशिवाय सभेत वरूड व मोर्शी या दोन तालुक्यातील २४७ गावे ही ड्रायझोनमध्ये असल्याने या ठिकाणी सिंचन व पिण्याचे पाण्याची समस्या वाढत असल्याने ही गावे यामधून वगळण्यात यावी, अशी मागणी सदस्य देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केली. दरम्यान या दोन्ही मुद्यावर सभागृहातील वातावरण जोरदार तापले होते. शिवणगाव येथील दलितवस्तीत पिण्याचे पाण्यासाठी असलेले बोअरवेल सिंचन तलावाच्या बांधकामामुळे बाधीत झाले होते. त्यामुळे अडीच वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला. तथापि प्रशानाने काहीच उपाययोजना न केल्याने गौरी देशमुख यांनी प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगलीत. दरम्यान त्या आक्रमक झाल्यात. अखेर सदस्याच्या तीव्र भावना लक्षात घेता हा प्रश्न महिनाभरात निकाली काढण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी दिले. यावेळी सीईओ के.एम. अहमद यांनी शब्द दिल्याने वातावरण निवळले. वरूड आणि मोर्शी तालुक्यातील २४७ गावे ड्रायझोनमध्ये आहेत. त्यामुळे या गावामधील शेतकरी व नागरीकांना पाणी असतानाही कुपनलीका,विहिरी करता येत नाही. ड्रायझोनमधील गावातील शेती सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. गावे ड्रायझोनमधून वगळण्यासाठी सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी देवेंद्र भुयार यांनी केली.सभेला सभापती वनिता पाल, सुशीला कुकडे, पुजा हाडोळे, अनिता मेश्राम, पार्वती काठोळे, सीईओ के.एम. अहमद, कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, संजय येवले आदी उपस्थित होते.जलयुक्त शिवारचाही आढावाजलव्यवस्थापन समिती सभेत सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यातील कोणती गावे समाविष्ट आहे. या ठिकाणी कोणत्या कामांचा समावेश होणार आहे, याची विस्तृत माहिती जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी सभेला उपस्थितीत असलेल्या कृषी अधीक्षक अधिकारी यांचे प्रतिनिधीला विचारली. मात्र याची पुरेशी माहिती नसल्याने यापुढील सभेत जलयुक्त शिवारची माहिती देण्याचे निर्र्देश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांंनी दिलेत. हा विषय उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती बळवंत वानखडे, जयंत देशमुख आदींनी उपस्थित केला होता, हे विशेष.
पाणी पुरवठा, ड्रायझोनचा मुद्दा तापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 11:46 PM
तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथील दलित वस्तीतील बोअरवेल पाणी पुरवठा मागील अडीच वर्षापासून नादुरूस्त आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : जलव्यस्थापन समितीचे सदस्य आक्रमक