शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
2
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
3
“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार
4
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
5
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
6
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळाळेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण
7
कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना
8
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
9
स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
10
५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले
11
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”
12
रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'या' ३ गोष्टी; सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा मोलाचा सल्ला
13
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन
14
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
15
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
16
Think Positive: स्वतःला आनंदी ठेवणे, हे आज मोठे आव्हान; जे AI ला सुद्धा जमणार नाही; पण... 
17
मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार
18
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
19
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
20
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."

आधार कार्ड काढून पाच वर्षे झाली; अपडेट केली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 16:18 IST

Amravati : वयाच्या पाचव्या आणि पंधराव्या वर्षी आधार अपडेट करणे आवश्यक

मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे : ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर केला जातो. प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. १८ वर्षांवरील नागरिकाकडे मतदान कार्ड, आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना असे ओळखपत्र असतात. परंतु, लहान मुलाकडे ओळखीचा पुरावा म्हणून केवळ आधार कार्ड हाच पुरावा असतो. याला वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे असते.

 एका दिवसाच्या बालकापासून ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे आधार कार्ड बनविण्यासाठी बायोमेट्रिक डिटेलची गरज नसते. मात्र जेव्हा बालक पाच वर्षांपेक्षा अधिक वयाचे होतो तेव्हा त्याचे आधार कार्ड बनविण्यासाठी बायोमेट्रिक डिटेलची आवश्यकता असते तसेच बालक ५ वर्ष आणि १५ वर्षांचे होते तेव्हा त्याला आधार अपडेट करावे लागते. अनेकदा लहान वयात बनविलेल्या आधार कार्डमध्ये हाताचे ठसे, डोळे यात वयानुसार बदल होत असल्याने ते वेळोवेळी अपडेट करण्याची आवश्यकता असते. यासाठी आधार अपडेट केंद्र, सीएससी सेंटर, बैंक, पोस्ट ऑफिस आदी ठिकाणी आधार अपडेटची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी वेळोवेळी आधार अपडेट करून घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ज्या पालकांनी आपल्या मुलाचे आधारकार्ड अपडेट करून घ्यावे.

मुलांचे आधार पाच वर्षांनंतर अपडेट करणे आवश्यकपाच वर्षाच्या आतील मुलांचे आधार बनवले जाते तेव्हा त्यांच्या डोळ्यांची बाहुली आणि फिंगर प्रिन्टस विकसित झालेली नसते. त्यामुळे आधार अपडेट करणे गरजेचे आहे.

खर्च किती?■ आधार केंद्रावर आधार अपडेट करण्यासाठी ५० रुपयांचे शुल्क आकारले जाते.■ अगदी कमी खर्चात आधार अपडेटची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोठे करणार अपडेट?जवळच्या आधार केंद्रावर जाऊन त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र देऊन प्रत्येक नागरिक आपल्या आधारमध्ये अद्ययावत माहिती अपडेट करू शकतो. पत्ता, नाव, मोबाइल नंबर, जन्म तारीख आदी दुरुस्त्या करता येतात.

मोठ्यांचे आधार दहा वर्षांनंतर करा अपडेटनागरिकांनी दहा वर्षांनी आधार अपडेट करणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकात शारीरिक बदल होत असतात. त्यामुळे वेळोवेळी आधार अपडेट करणे 

महत्त्वाचे असते.कागदपत्रे काय लागतात?जन्म तारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा, फोटो या शिवाय इतर कागदपत्रे आधार अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर द्यावे लागतात. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डAmravatiअमरावती