अमरावती : जिल्ह्यात दहा दिवसांपासून पावसाची दडी असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. पावसाअभावी आता पेरण्या उलटल्या व दुबार पेरणीचे सावट आहे.
------------------------
............. कोरोना मृत्यू निरंक
अमरावती : जिल्ह्यात .................... कोरोना संसर्गाचा एकही मृत्यू नसल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,५५५ संक्रमितांचे मृत्यू झाले. हे प्रमाण १.६२ टक्के आहे.
-----------------------
डबलिंगचा रेट १२४ दिवसांवर
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दुपटीचा कालावधी १२४ दिवसांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्येत कमी आल्याने डबलिंगचे दिवस वाढत असल्याचे आरोग्य यंत्रणाद्वारे सांगण्यात आले.
------------------
ग्रामीणमध्ये वाढले डेंग्यूचे रुग्ण
अमरावती : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डेंग्यूचे रुग्ण अधिक प्रमाणात नोंद होत असल्याने चिंता वाढली आहे. प्रशासनाद्वारे आवश्यक उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे.
-----------------------
कॅम्प रोडची दुरुस्ती केव्हा?
अमरावती : शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यानचा रस्ता उखडला आहे. त्वरित दुरुस्ती करण्याची नागरिकांची नागरिकांची मागणी आहे