शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

- तर मीरा ठरली असती सर्वांत कमी वयाची अवयवदाता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 10:16 PM

मीरा अवघ्या तीन महिन्यांची गोंडस चिमुकली. कार अपघातानंतर उपचारासाठी नागपूरला आणले. ती बे्रनडेड अवस्थेत गेल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर खुद्द डॉक्टर असलेल्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. मात्र, स्वत:ला सावरत त्यांनी तिच्या अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देअवयवदानापूर्वीच मालवली प्राणज्योत : डॉ. सावरकर दाम्पत्याच्या तळमळीला सलाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मीरा अवघ्या तीन महिन्यांची गोंडस चिमुकली. कार अपघातानंतर उपचारासाठी नागपूरला आणले. ती बे्रनडेड अवस्थेत गेल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर खुद्द डॉक्टर असलेल्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. मात्र, स्वत:ला सावरत त्यांनी तिच्या अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. तिच्या अवयवदानातून दिल्लीतील चौघांना जीवनदान मिळणार होते. शुक्रवारी सकाळी १० वाजता ही प्रक्रिया सुरू होणार होती. त्याच्या काही तासांपूर्वी मीराची प्राणज्योत मालवली. यावेळी मात्र तिच्या आई-वडिलांचे दु:ख आभाळाएवढे मोठे झाले.काँग्रेसनगर रोडवरील रहिवासी वैद्यकीय व्यावसायिक उमेश सावरकर, अश्विनी सावरकर व तीन महिन्यांची मीरा हे कुटुंबीय त्यांच्या रुग्णालयापुढे कारमध्ये बसले असताना, चारचाकी वाहन धडकले. अपघातात सावरकर दाम्पत्यासह मीरा गंभीर जखमी झाली. प्रकृती गंभीर असल्यामुळे मीराला तत्काळ नागपूर हलविण्यात आले. तिला वाचविण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. डॉक्टरांनी तिला बे्रनडेड घोषित केल्यानंतर तिचे अवयवदान करण्याचा निर्णय सावरकर दाम्पत्याने घेतला. तिचे अवयवरूपाने अस्तित्व राहील, ही त्यामागील भावना. त्यानुसार त्यांनी स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने नॅशनल आॅर्गन ट्रान्सप्लांट कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.पोलीस कारवाईत दिरंगाई; चालकाला अटकडॉ. सावरकर यांच्या कारला धडक देणाऱ्या कारच्या चालकाला फे्रजरपुरा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. २ डिसेंबर रोजी हा अपघात घडला होता. पवन पंजाब मापले (२४, रा. रामा साऊर) असे आरोपीचे नाव आहे. एमएच २७ बीई-५५२९ क्रमांकाचे हे वाहन पोलिसांनी जप्त केले. ती कार जयप्रकाश मतानी (रा. दस्तुरनगर) यांची आहे. पोलिसांनी कारवाईविषयी तत्परता दाखविली नसल्याचा डॉ. सावरकरांचा आरोप आहे.प्रयत्नांची शर्थ; असाध्य झाले नाही साध्यइतक्या कमी वयात कुणाचे अवयवदान आजपर्यंत कोठे झाले आहे का, हे ऐकिवात नाही. मात्र, ते घडवून आणण्याची जिद्द काही डॉक्टरांनी उराशी बाळगली होती. मीराच्या आई-वडिलांनी तिच्या वियोगाचे दु:ख दूर सारून त्यासाठी प्रयत्न केले. प्रामाणिक प्रयत्नांना यशाची जोड मिळेल, अशी अपेक्षा या अवयवदानासाठी धडपडणाºया सर्वांना होती. मात्र, असाध्य ते साध्य होऊ शकले नाही.मीराचे अवयव दान करण्यासाठी सर्व यंत्रणांकडून रीतसर परवानगी घेतली. सर्व तयारी झाली होती. मात्र, अवघ्या काही तासांत सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.- डॉ. उमेश सावरकर, मीराचे वडील.

टॅग्स :Accidentअपघात