आॅनलाईन लोकमतअमरावती : नवऱ्याच्या शोधात इर्विन पालथे घातल्यानंतर तिने रात्री पोलीस चौकीसमोरील आडोशाला विसावा घेतला. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या नराधमाने तिच्या कुशीतून अडीच वर्षीय चिमुकलीला पळविले. तिचा आकांत पाहून तेथील नागरिकांनी शोधासाठी तत्परता दाखविली. लगतच्या एका अंधाऱ्या गल्लीत ‘तो’ चिमुकलीसोबत आढळून आला. त्याला वेळीच पकडले नसते, तर ती चिमुकली लैंगिक अत्याचाराची बळी ठरली असती.इर्विन रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. उमेश ऊर्फ हड्डी शंकर धुमाळे (३०, रा. समाधाननगर) असे कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या आरोपीचे नाव आहे. शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायखेडा येथील ही महिला शुक्रवारी पतीच्या शोधात जिल्हा सामान्य रुग्णालयात आली होती. तिने रुग्णालयात पतीचा शोध घेतला. मात्र, तो दिसला नाही. रात्र झाल्याने ती इर्विन रुग्णालयातील पोलीस चौकीसमोर तिच्या दोन मुलांना सोबत घेऊन झोपली. मध्यरात्री १२.३० वाजता उमेश तेथे आला आणि महिलेजवळील अडीच वर्षीय मुलीला घेऊन पसार झाला. महिलेला जाग आला तेव्हा तिला धक्काच बसला. तिने आरडाओरड व रडारड सुरू केली. उपस्थित नागरिकांनी इर्विन चौकीतील पोलिसांना माहिती देऊन मुलीचा शोध घेतला. चौकातील एका अंधाऱ्या गल्लीत उमेश हा मुलीसोबत आढळून आला. नागरिकांनी त्याला पकडून कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले. उमेश हा गुंड प्रवृत्तीचा असून, विविध ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ५११ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.इर्विन टवाळखोरांचा अड्डाइर्विन रुग्णालय परिसरात मद्यपी, भिकारी व चोरांचा सुळसुळाट झाला आहे. पोलीस चौकी असतानाही त्या ठिकाणी टवाळखोरांचा वावर असतो. काही दिवसांपूर्वी ठाणेदार दिलीप पाटील यांनी अशा टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला होता.
-तर ‘ती’ ठरली असती अत्याचाराची बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 10:19 PM
आॅनलाईन लोकमतअमरावती : नवऱ्याच्या शोधात इर्विन पालथे घातल्यानंतर तिने रात्री पोलीस चौकीसमोरील आडोशाला विसावा घेतला. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या नराधमाने तिच्या कुशीतून अडीच वर्षीय चिमुकलीला पळविले. तिचा आकांत पाहून तेथील नागरिकांनी शोधासाठी तत्परता दाखविली. लगतच्या एका अंधाऱ्या गल्लीत ‘तो’ चिमुकलीसोबत आढळून आला. त्याला वेळीच पकडले नसते, तर ती चिमुकली लैंगिक अत्याचाराची ...
ठळक मुद्देइर्विनमधील घटना : अपहृत चिमुकली सापडली