लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हॉटेलमधील कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकारच होऊ नये, या मताचा मी आहे. मात्र, चौघांनी दारू पिऊन धुमाकूळ घातला. यासाठी आयोजकांनी डोळ्यांत पाणी आणून दिलगिरी व्यक्त केली. या घटनेला आता सांप्रदायिक रंग देऊन सामाजिक बहिष्काराचा विषय केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार असा कुठलाच निर्णय घेता येत नाही. मी स्वत: एक व्यापारी असल्याने या घटनेचा निषेध करतो, अशी स्पष्ट भूमिका हॉटेल रंगोली पर्लचे संचालक नितीन देशमुख यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत मांडली.एका कुटुंबाकडील लग्नाच्या अगोदरच्या दिवशी हॉटेल रंगोली पर्लमध्ये आयोजित पार्टीदरम्यान भाजीत मीठ कमी असल्याच्या कारणावरून चौघांनी धुडगूस घातला. या प्रकाराची माहिती मिळताच रात्री १२.५० च्या सुमारास मी हॉटेलमध्ये आलो. यावेळी पाठीमागून कुणी तरी मला मारण्याचा प्रयत्न केला. माझा चष्मादेखील फुटला. मी हॉटेल व्यावसायिक आसल्याने स्वादिष्ट भोजनासह ग्राहकांना चांगली सेवा देणे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे नितीन देशमुख यांनी सांगितले.आता व्यापारी एकतेच्या नावावर हॉटेलवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रकार मला समजला. पोलिसांनी याबाबत त्या संघटनेवर कारवाई करावी. मी कुण्याही संघटनेकडे गेलो नाही. आता घटनेचा विपर्यास केला जात आहे. कुणी बहिष्कार टाका म्हटले म्हणून बहिष्कार होत नसतो. माझी लढाई मी एकटाच लढणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.‘त्या’ चौघांचे मेडिकल का केले नाही?हॉटेलमध्ये चौघांनी मद्यपान करून धुडगूस घातला. त्यांनीच पोलिसांत तक्रार दिली. मारहाण झाल्याने मी तक्रार दिली असता, त्या चौघांची वैद्यकीय तपासणी पोलिसांनी का केले नाही, याचे उत्तर पोलीसच देऊ शकतात, असे नितीन देशमुख म्हणाले.सीटी स्कॅन दुसऱ्याकडून मागवाधुडगूस घालणाºयांचे सीटी स्कॅन निश्चितच चुकीचे आहे. आताही दुसºया ठिकाणावरून सीटी स्कॅन मागवा. यामध्ये फ्रॅक्चर निघणारच नाही, असा दावा नितीन देशमुख यांनी केला. त्यामुळे पोलिसांच्या एकूण तपासावरच प्रश्नचिन्ह लागले आहेत.
हॉटेलमधील घटनेला सांप्रदायिक रंग देणे चुकीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 1:24 AM
हॉटेलमधील कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकारच होऊ नये, या मताचा मी आहे. मात्र, चौघांनी दारू पिऊन धुमाकूळ घातला. यासाठी आयोजकांनी डोळ्यांत पाणी आणून दिलगिरी व्यक्त केली. या घटनेला आता सांप्रदायिक रंग देऊन सामाजिक बहिष्काराचा विषय केला जात आहे.
ठळक मुद्देनितीन देशमुख : सामाजिक बहिष्कार; सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवहेलना