शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

इतरांना अन् स्वत:लाही क्षमा करता येणे हा मोठा गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:29 PM

क्षमा करणे हा एकच गुण मनुष्यप्राण्याला इतर सर्व प्राणिमात्रांपासून वेगळे करतो. क्षमाशीलतेच्या या अनमोल दागिन्यामुळे जसे माणसाचे वेगळेपण उठून दिसते तसेच मानवी सभ्यतेची अन् संस्कृतीची उंचीही वाढते, अशा भावना काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल्या. ‘गुड बोला, गोड बोला’ यानिमित्ताने त्या ‘लोकमत’शी संवाद साधत होत्या.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांनी सांगितला आनंदी जगण्याचा मंत्र

अमरावती : क्षमा करणे हा एकच गुण मनुष्यप्राण्याला इतर सर्व प्राणिमात्रांपासून वेगळे करतो. क्षमाशीलतेच्या या अनमोल दागिन्यामुळे जसे माणसाचे वेगळेपण उठून दिसते तसेच मानवी सभ्यतेची अन् संस्कृतीची उंचीही वाढते, अशा भावना काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल्या. ‘गुड बोला, गोड बोला’ यानिमित्ताने त्या ‘लोकमत’शी संवाद साधत होत्या.शिक्षणाने वकील असलेल्या, आक्रमक नेतृत्वासाठी परिचित असलेल्या विदर्भातील एकमेव महिला विधानसभा सदस्य असलेल्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘one who learns to forgive, leads to a happy and peaceful life’ अर्थात ‘जी व्यक्ती क्षमा करण्याचा सद्गुण अंगी बाळगते, ती नेहतीच आनंदी आणि शांतीपूर्ण आयुष्य जगते.’ इतरांना तर क्षमा कराच; पण त्याचवेळी स्वत:लाही क्षमा करा. संवेदनशीलपणे अनुभवल्यास आपल्या संस्कृतीत, आपल्या सणावारांमध्ये मन:शांतीचे असे गमक दडल्याची अनुभूती आवर्जून येते. मकर संक्रांतीचे औचित्य साधा; क्षमा करा. शांत व्हा. आनंदी व्हा. माणुसकीचा धागा गुंफा. देश जोडण्याच्या ‘लोकमत’च्या या उपक्रमात मी सहभागी झाले, तुम्हीही व्हा, असा संदेश यशोमती यांनी दिला.आयुष्य ही न संपणारी स्पर्धा आहे. रोज दिवस उजाडला की, धडपड, धावपळ, चढाओढ ही आलीच. समस्या अन् दु:ख हेदेखील आयुष्याचे सांगाती. तरीही आयुष्य निराशाजनक मुळीच नाही. ते ऊर्जावान आहे. आनंददायी आहे. क्षणभर थांबून क्षमाशीलतेचा विचार केला की, इतरांप्रति प्रेमभाव निर्माण होतो.