शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

‘जैन’ चिवड्यात तळलेली पाल

By admin | Published: May 02, 2017 12:36 AM

मनभरी पाठोपाठ आता ‘जैन’ कंपनीच्या चिवडा पाकिटातही चक्क तळलेली पाल आढळून आल्याने खाद्यपदार्थांची विश्वासार्हता पुन्हा एका चव्हाट्यावर आली आहे.

खळबळ : ग्राहकाला मळमळ-उलट्या, एफडीएकडे तक्रार करणार अमरावती : मनभरी पाठोपाठ आता ‘जैन’ कंपनीच्या चिवडा पाकिटातही चक्क तळलेली पाल आढळून आल्याने खाद्यपदार्थांची विश्वासार्हता पुन्हा एका चव्हाट्यावर आली आहे. संजय गांधीनगरातील नागरिक शरद पखाले यांनी शामनगरातील ‘मातोश्री सेल्स’ या दुकानातून खरेदी केलेल्या या चिवड्यात ही पाल आढळून आली. २९ एप्रिल रोजी हा प्रकार उघडकीस आला. इतक उत्पादनांच्या तुलनेत स्वस्त दरात उपलब्ध होणारा जैन चिवडा मोठ्या संख्येने ग्राहक खरेदी करतात. घराघरात तो खाल्ला जातो. मात्र, आता या चिवड्याच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह लागले आहे. शरद पखाले यांनी २९ एप्रिल रोजी शामनगरातील मातोश्री सेल्स या दुकानातून जैन चिवड्याचे पाकिट खरेदी केले. जनतेचे आरोग्य धोक्यातअमरावती : त्यांनी घरी जाऊन ते उघडले असता व त्यातील दोन चार घास खाल्ल्यानंतर त्यांना त्यात चक्क तळलेली पाल आढळून आली. त्यांनी १ मे रोजी सोमवारी संबंधित दुकानदाराकडे जाऊन हा प्रकार सांगितला. त्यावर दुकानदाराने चिवड्याचे पाकिट बदलवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, पालयुक्त चिवडा थोडासा पोटात गेल्यानंतर शरद पखाले यांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांचे डोकेही दुखू लागले. त्यांनी लगेच जिल्हा सामान्य रूग्णालयात जाऊन स्वत:ची तपासणी करून घेतली. आता या प्रकाराची शरद पखाले हे एफडीएकडे तक्रार करणार आहेत. (प्रतिनिधी)विश्वासार्हता वाऱ्यावरखाद्यपदार्थांची विश्वासार्हता नेहमीच चव्हाट्यावर येत असते. एफडीएच्या दुर्लक्षाने खाद्यपदार्थ उत्पादक व विक्रेत्यांवर कोणताच अंकुश राहिलेला नाही. ग्राहकांच्या आरोेग्यालाच धोका निर्माण झाला. रघुवीर, मनभरी पाठोपाठ आता जैनकाही महिन्यांपूर्वी रघुवीरच्या कचोरीत अळी आढळली होती. त्यानंतर मनभरीच्या चिवड्यात तळलेली पाल आढळली होती. पश्चात सोयाभेळमध्ये तळलेले झुरळ आणि अगदी अलिकडेच सँडविच ब्रेडमध्ये बुरशी आढळली होती. हे सगळे प्रकार ‘लोकमत’नेच उघडकीस आणून नंतर लाऊन धरले होते, हे विशेष. आता जैन चिवड्यात तळलेली पाल आढळल्याची माहिती ग्राहकाने ‘लोकमत’ला दिली. लोकमतने खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत केलेल्या सर्वंकष जनजागृतीचा हा परिणाम आहे. यानंतरही असले काही प्रकार आढळल्यास नागरिक ‘लोकमत’शी संपर्क साधू शकतात.