लोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : महाराष्टÑ शासनाने राज्यात तीन वर्षांपासून अंमलात आणलेल्या जलयुक्त शिवार योजनेत शिवारातून वाहून जाणारे पाणी अडविल्याने शेतकºयांना फायदा होत आहे. ही योजना शेतकºयांसाठी क्रांतिकारक ठरली आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केले.गुरुवारी अमरावतीहून वर्धेकडे जाताना ना. शिंदे यांनी चांदूररेल्वे तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली. चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा (म्हाली) व नेकनामपूर-राजना येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधलेल्या बंधाºयांची पाहणी केली. तेथे ना. राम शिंदे यांनी जलपूजन केले.भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड, प्रदीप शिंगोरे, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपविभागीय अधिकारी वनश्री लाभशेटवार, तहसीलदार बी.ए. राजगडकर, बीडीओ सोनाली मातकर तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी एका शेतकºयाने बंधारा अरुंद झाल्याची तक्रार थेट मंत्र्यांकडे केली.
जलयुक्तची योजना शेतकºयांसाठी क्रांतिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 11:13 PM
महाराष्टÑ शासनाने राज्यात तीन वर्षांपासून अंमलात आणलेल्या जलयुक्त शिवार योजनेत शिवारातून वाहून जाणारे पाणी अडविल्याने शेतकºयांना फायदा होत आहे.
ठळक मुद्देराम शिंदे : बंधाºयांचे पूजन, धानोरा, नेकनामपूर येथे पाहणी