लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुन्हे शाखेने बुलडाण्यातून अटक केलेला कुख्यात चोर किशोर वायाळचे पुढील टार्गेट जळगाव होते. त्याला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर हजर केले असता, त्यानेच ही बाब स्पष्ट केली. सदनिकेत जाऊन तेथील कोणते फ्लॅटधारक घरी आहेत वा नाहीत, याची चौकशीत किशोर करायचा आणि त्यानंतर फ्लॅट फोडून मुद्देमाल लंपास करायचा. त्याने चोरीलाच उपजीविकेचे साधन बनविल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकशीत पुढे आली आहे.किशोर वायाळ हा बुलडाण्यात राहून विविध शहरांत चोºया करायचा. अनेकदा तो पोलिसांच्या हाती लागला. मात्र, कारागृहात बाहेर येताच पुन्हा चोरीच्या व्यवसायात सक्रिय झाला. किशोरने अमरावतीमध्ये चोºया करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरून नेला. त्याच्याकडून पोलिसांनी १८ लाखांचे दागिने जप्त केले असून, आता शहरातील विविध गुन्ह्यांमध्ये विविध ठाण्यांकडून किशोरची चौकशी करण्यात येत आहे.किशोरने सोलापूर, सातारा, अकोल्यासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातही चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्याने तब्बल २०० हून अधिक चोºया केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. किशोर वायाळ याच्या टोळीत एक साथीदार असल्याची माहिती पुढे आली असली तरी तो विविध शहरांतील कुख्यात चोरांच्या संपर्कात असल्याची माहितीही पुढे येत आहे.किशोर असा करतो चोरीइन्स्टंट चोरीत माहीर असणारा किशोर वायाळ दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेतच चोरी करीत होता. या वेळेत बहुतांश सदनिकांमध्ये शुकशुकाट असतो. अशावेळी तो सदनिकेत जाऊन कोणते फ्लॅट बंद आहे, याची पाहणी करीत होता. त्यानंतर त्याच सदनिकेतील अन्य फ्लॅटधारकांना त्या बंद फ्लॅटचे साहेब कुठे गेले, मला भेटायचे आहे, ते केव्हा येणार, अशी सर्व माहिती विचारायचा. यानंतरच कोणत्या फ्लॅटमध्ये चोरी करायची, हे किशोर ठरवित होता.लग्नाला गेलेल्या कुटुंबांच्या घरी चोरी करण्याचे तो टाळायचालग्न समारंभाला जाणारे कुटुंब दागदागिने घालूनच जातात. ही बाब लक्षात घेऊन किशोर अशा घरात चोरी करण्याचे टाळत होता, असे त्यानेच पोलिसांना सांगितले आहे. बहुतेक चोºया त्याने दिवसाढवळ्या केल्या आहेत. अशावेळी फ्लॅट स्कीममध्ये बहुतांश शुकशुकाट असतो.किशोर वायाळने चोरीला उपजीविकेचे साधन बनविले. लग्न समारंभात कुटुंब दागिने घालून जात असल्यामुळे तो त्यांच्याकडे चोरी करीत नव्हता. उलट, आजूबाजूला विचारपूस केल्यानंतर तो बंद फ्लॅटमधून ऐवज लंपास करायचा. तुुरुंगातून बाहेर येताच पुन्हा चोरी करायचा. त्याचे पुढील चोरीचे टार्गेट जळगाव असल्याचे तो सांगत होता.- दत्तात्रय मंडलिक,पोलीस आयुक्त.
किशोर वायाळचे आगामी टार्गेट होते जळगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 10:48 PM
गुन्हे शाखेने बुलडाण्यातून अटक केलेला कुख्यात चोर किशोर वायाळचे पुढील टार्गेट जळगाव होते. त्याला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर हजर केले असता, त्यानेच ही बाब स्पष्ट केली.
ठळक मुद्देकुख्यात आरोपी : सदनिकेत चौकशी करून करायचा चोऱ्या