शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

‘जन-आक्रोश’च करेल भाजपला सत्तेतून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 11:18 PM

केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात जनसामान्यांमध्ये उफाळलेला असंतोष आणि मनामनांतील जन-आक्रोश भाजपला सत्तेतून बेदखल करेल, असा दमदार इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी येथील सायन्सस्कोर मैदानावर मंगळवारी झालेल्या विभागीय जन-आक्रोश मेळाव्यात दिला.

ठळक मुद्देदमदार इशारा : काँग्रेस नेत्यांचा सरकारविरूद्ध एल्गार

अमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारविरोधात जनसामान्यांमध्ये उफाळलेला असंतोष आणि मनामनांतील जन-आक्रोश भाजपला सत्तेतून बेदखल करेल, असा दमदार इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी येथील सायन्सस्कोर मैदानावर मंगळवारी झालेल्या विभागीय जन-आक्रोश मेळाव्यात दिला. विधानसभा व लोकसभेचे घोडामैदान दूर असले तरी जन-आक्रोश मेळाव्याला मिळालेल्या प्रचंड लोकसमर्थनामुळे काँग्रेसने निवडणुकीच्या निश्चित निर्धाराने पाऊल टाकल्याचे जाणवत होते. काँग्रेसशिवाय तरणोपाय नसल्याचा दावा करत या सरकारला खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला.लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फसलेली कर्जमाफी, वाढती महागाई, शेतकरी, कष्टकºयांची दुरवस्था आणि जीएसटी- नोटबंदीचा जनसामान्यांवर झालेला परिणाम हे मुद्दे ‘कॅश’ करत काँग्रेसने सर्वसामान्यांच्या मनातील कोलाहल अचूक टिपला. जनआक्रोश मेळाव्याच्या निमित्ताने भाजपवर शरसंधान साधत पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला.एरवी गटातटांत विभागलेली काँग्रेस मंगळवारच्या जनआक्रोश मेळाव्याच्या निमित्ताने एकसंध दिसून आली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात शहराध्यक्ष किशोर बोरकर, आ.वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर यांनी केलेल्या सुंदर नियोजनाची देश व राज्यपातळीवरील नेत्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. मेळाव्याला १५ हजारांहून अधिक जनसमुदाय एकत्र आल्याने काँग्रेला मोठे बळ मिळाले. त्या पाठबळावर मग काँग्रेसने भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचा हुंकार भरला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री वसंत पुरके,शिवाजीराव मोघे, आ. नसीम खान, आ.यशोमती ठाकूर, आ.वीरेंद्र जगताप, चारूलता टोकस, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही मेळाव्यानिमित्त आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या सरकारच्या काळात कोणताच वर्ग सुखी नाही, जनता त्रस्त आहे. या सरकारचे बुरे दिन सुरू झाले असून त्याची सुरवात नांदेडपासून झाल्याचे विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणालेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाचे दिवसाचे स्मरण उपस्थितांना करून दिले.यावेळी व्यासपीठावर महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चारुलता टोकस, आ. वीरेंद्र जगातप, आ. यशोमती ठाकूर, आ. राहुल बोंद्रे, आ. अमित झनक, आ. अमर काळे, आ. नसिम खान, अमरावती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंत पुरके, अकोला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल, बबनराव चौधरी, वाशिमचे दिलीप सरनाईक, यवतमाळचे वजाहत मिर्झा, माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, माजी मंत्री अजहर हुसैन, माजी आमदार केवलराम काळे, विजय खडसे, दिलीप सानंदा, नातीकउद्दीन खतीब, नरेशचंद्र ठाकरे, मदन भरगड, समन्वयक श्याम उमाळकर, काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव संजय खोडके, शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, ज्येष्ठ नेत्या पुष्पा बोंडे, कांचनमाला गावंडे, अविनाश मार्डीकर, चेतन वाठोडकर, भैय्या पवार, जि.प.सभापती जयंत देशमुख, वनिता पाल, जि.प. सदस्य प्रकाश साबळे, अभिजित देवके, काँग्रेसचे सर्व जि.प. सदस्य, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.फडणवीस प्री-मॅच्युअर बेबी - वसंत पुरकेप्रसूतीसाठी नऊ महिने, नऊ दिवसांचाच काळ असतो. मात्र देवेंद्र फडवणीस हे सहा महिन्यांतच बाहेर पडले. ते प्री-मॅच्युअर बेबी असल्याचा प्रहार माजी मंत्री वसंत पुरके यांनी केला. आपल्या खुशखुशीत शैलीत आणि गावरान बोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला नालायक संबोधत ‘का रे बाबूू आता कसं वाटते’ असा सवाल त्यांनी उपस्थित जनसमुदायासमोर केला. काँग्रेस खºया अर्थाने सेक्युलर असल्याचा दावा करीत राजसत्तेवर धर्मसत्तेचा वचक हवा, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. केंद्र व राज्य शासनाने चालविलेल्या 'मी लाभार्थी' या जाहिरात मोहिमेवर काँग्रेस नेत्यांनी बोचरी टीका केली. जाहिरातीमध्ये दाखविलेला गुळगुळीत रस्ता देशातील नव्हे, तर हाँगकॉँगचा असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला.विकृत मनोवृत्तीचे सरकार - चारूलता टोकसदारूची विक्री वाढवायची असेल तर बाटलीवर महिलांची नावे छापण्याचा सल्ला भाजपचे मंत्री देतात. त्यावरून या सरकारची विकृत मनोवृत्ती जगजाहीर झाल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारूलता टोकस यांनी केली. काँग्रेस सरकारच्या काळात तुरीची डाळ ६५ रूपयांवर गेल्याचा बाऊ करीत हेमामालिनी, स्मृती इराणी, सुषमा स्वराज यांनी अवघा देश डोक्यावर घेतला होता. आता तीच तूरडाळ २०० रूपयांवर पोहोचली असताना भाजप चकार शब्दही काढत नाही. यावरून हे सरकार मुके व बहिरे असल्याची टीका त्यांनी केली.‘चाय की पत्ती समझ के बेच डालेगा’ - आ. यशोमती ठाकूरसत्तेत नाही म्हणून काँग्रेसला शेतकºयांचा पुळका आल्याचा आरोप होत आहे. मात्र, हा शेतकºयांमधील आक्रोश आहे. हा जनआक्रोशच भाजप-शिवसेना सरकारला सत्तेतून खाली खेचेल, असा घणाघात आ. यशोमती ठाकूर यांनी केला. ओजस्वी भाषणशैलीने उपस्थितांमध्ये स्फुल्लिंग चेतवित त्यांनी मोदी व फडणवीस सरकारवर ‘-हम लोगो ने सौंप दि इस बार देश की बागडोर चायवाले के हाथ में, वो तुम्हारे-हमारे देश को चाय की पत्ती समझ के बेच डालेंगा’, अशा शायराना अंदाजात टिकास्त्र सोडले.मुख्यमंत्र्यांसाठी जगतापांचा बोचरा शब्दप्रयोगसंचालन करताना आमदार वीरेंद्र जगताप यांनी मुख्यमंत्र्यांवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्ला केला. सामान्यजनांच्या भावना व्यक्त करण्यासाठी जिव्हारी लागणाºया खास वैदर्भीय शब्दाचा त्यांनी वापर केला. उपस्थितांनी शिट्ट्या वाजवून नि टाळ्यांचा कडकडाट करुन ‘त्या’ शब्दाला दाद दिली. शेतकºयांचे प्रश्न अभ्यासूपणे मांडणारा नेता अशी ओळख असलेल्या वीरेंद्र जगताप यांची ती झलक या जन-आक्रोश मेळाव्यातही दिसली. जोडीला वºहाडी आणि वैदर्भीय शब्दांची फोडणी असल्याने संचालन खमंग झाले.मोदी, फडणविसांचे सरकार बरबाद करणारे : बबलू देशमुखतीन वर्षांत मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांकांसह सर्वच घटकांना बरबाद करण्याचे एकमेव काम केल्याचा प्रहार जिल्हा काँग्रसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रास्ताविकातून केला. नाना अडचणी आणूनही जिल्हा बँकेचा गड शाबूत ठेवणाºया बबलू देशमुखांनी शेतकºयांची कर्जमाफी म्हणजे भुलथापा आहेत. मनामनात आक्रोश आहे. भाजपचे दिवस आता संपत आले आहेत, अशा शब्दात त्यांनी सत्ताधिशांचे कान उपटले.डिजिटल नव्हे, जटील महाराष्ट्र : राधाकृष्ण विखे पाटीलडिजिटल महाराष्ट्राच्या बाता मारणाºया भाजप सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्य डिजिटल नव्हे, तर जटील बनल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. भाजप सरकारच्या काळात तब्बल १० हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्यात, तर ६७ हजार मुले कुपोषणाने दगावली. भाजपचे हे दळभद्री सरकार शेतकºयांच्या विरोधात आहे. शिवसेनेचे ‘चला सत्ता सोडू या’चे रडगाणे सुरू आहे. त्यामुळे या सरकारला आता जनताच खाली खेचेल, असे ते म्हणाले.