--------------------
जरूड शिवारातून केबल लंपास
जरूड : जरूड शिवारातील ४२ वर्षीय महिलेच्या शेतातून १६० फूट विहिरीवरील केबल व बोअरवेलचा ६० फूट केबल असा सात हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी वरूड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
----------------
----------------
तिवसा येथे युवकांमध्ये मारहाण
तिवसा : शहरातील गोंडपुरा भागात घरासमोर कंचे खेळायचे नाही, असे म्हटल्यावरून राहुल संजय सलाडे (३२) याने दीपक रामदास सहारे (४०) याला काठीने डोक्यावर मारले. रंगुबाई सहारे यांना ढकलल्याने त्यांनाही जखम झाली. याप्रकरणी राहुलने दीपकविरुद्ध तक्रार दाखल केली. दीपकने लाकडी दांडा डोक्यात मारल्याची फिर्याद त्याने नोंदविली. तिवसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
------------------
कळाशी येथे रोडरोमियोची युवतीला धमकी
दर्यापूर : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळाशी येथील २० वर्षीय युवतीला गाठून ब्रजेश कुऱ्हाडे (२३, रा. माहुली धांडे) याने तू मला भेटायला का येत नाही, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याने या ओळखीचा गैरफायदा ब्रजेशने जिवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------------------