शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
2
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ, येणी वसूल होतील; मन प्रसन्न होईल, शुभ फलदायी दिवस
3
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम
4
विधानसभा जिंकू आणि सत्ता आणू : राज ठाकरे
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्ता ३% वाढला
6
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान!
7
काँग्रेसची ६० नावे निश्चित! छाननी समितीची दिल्लीत चर्चा; २० तारखेनंतर येणार पहिली यादी
8
शेतकऱ्यांना माेठा दिलासा, सरकारने वाढविले दर; गव्हाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये वाढ
9
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
10
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
11
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
12
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
13
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
14
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
15
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
16
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
17
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
18
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
19
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
20
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप

शाळा आरोग्य केंद्राची अचानकच होणार झाडाझडती

By admin | Published: November 03, 2016 12:23 AM

जिल्हा परिषद शाळा, आरोग्य केंद्र व अन्य ठिकाणी मिनीमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन ...

विभागीय आयुक्तांचे आदेश : अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्जअमरावती : जिल्हा परिषद शाळा, आरोग्य केंद्र व अन्य ठिकाणी मिनीमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन तेथील परिस्थितीची व सोई-सुविधेची तपासणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी मागील महिन्यात जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार आता याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सुरू केली आहे.जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या १४ पंचायत समितीसह जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, आयुर्वेदिक दवाखाने, ग्रामपंचायती, अशा विविध संस्था येतात. या अंतर्गत विकास कामे, शासकीय योजना, शिक्षण, नागरी आरोग्य सोई सुविधा अशा योजनाची अंमलबजावणी व त्यासाठीचे प्रशासकीय कामकाज केले जाते. मात्र बरेचवेळा शासकीय निधी, विकासकामे, अन्य प्रशासकीय कामकाजात उणिवा दिसून येतात. तशा तक्रारीहीसुध्दा मुख्य कार्यालयाकडे येतात. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालय ते ग्रामस्तरावर असलेल्या ग्रामपंचायती, शाळा, आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने अशा ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन परिस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यापूर्वीसुध्दा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख अधिकारी यांच्याकडून अचानक भेटीचा कार्यक्रम राबविला जात होता. मात्र यात मध्यंतरी खंड पडल्याने अचानक भेटीचा कार्यक्रम अर्ध्यावरच थांबला आहे. त्यामुळे यावर जिल्हा परिषद प्रशासनाचे प्रमुख म्हणून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटीच्या कार्यक्रमावर अधिक भर देण्याचा सल्ला या बैठकीत विभागीय आयुक्त यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार आता जिल्हा परिषदेने या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)दप्तराचे ओझे कायम दफ्तरांचे ओझे हा विषय विद्यार्थ्यांसोबतच पालकांसाठीही चांगलाच डोकेदुखी ठरत आहे. काही संघटनांनी दफ्तरांचे हे ओझे कमी करण्याच्या मागणीचा वेळोवेळी पाठपुरावा केला. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. अधिकारी कधीही शाळेत येतील आणि तपासणी करतील. त्यामुळे शाळा निश्चितच ओझे कमी करण्यासाठी धोरण ठरवतील. परिणामी विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना ही अपेक्षाही फोल ठरली आहे.