वरुड : येथील एका जिनिंगला मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आग लागली. यात मशनरीसह सुमारे ११ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात कोट्यवधींचे नुकसान झाले. आगीचे कारण कळू शकले नाही.प्राप्त माहितीनुसार, मोर्शी मार्गावर विजय जावले, संजय जावले यांच्या मालकीचे शिवम जिनिंग प्रेसिंग आहे. जिनिंग संचालकांनी शेतकरी व व्यापाºयांकडून खरेदी केलेला सुमारे ११ हजार क्विंटल कापसाच्या तीन गंजी लावून यार्डात ठेवल्या होत्या. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक येथील एका गंजीला आग लागली.तीन पालिकांची मदतपाहता पाहता ही आग अन्य गंजीतही पसरली. आगीने फॅक्ट्रीला देखील आपल्या कवेत घेतले. . आग लागल्याची माहिती अग्नीशमन विभागास देण्यात आली. ही बातमी वरूड शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली.पोलिस व जीनमधील नागरिकांनी याबाबत अग्निशमन पथकाला माहिती दिली. वरूड, मोर्शी व शेंदूरजना घाट येथील नगर परिषदेचे अग्नीशमन बंब दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. वृत्त लिहिस्तोवर आगीवर आग विझविण्याचे काम सुरू होते. जिनिंगच्या परिसराबाहेर नागरिकांनी गर्दी केल्याने वरूड पोलिसांना पाचारण करण्यात आले. वरूडचे ठाणेदार गोरख दिवे यांनी यादरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता.
जिनिंगला आग, ११ हजार क्विंटल कापूस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:23 AM
येथील एका जिनिंगला मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आग लागली.
ठळक मुद्देवरुड येथील घटना : मशीनरीही जळाल्या, कोट्यवधींचे नुकसान