कोविड सेंटरची संख्या घटली, सेवेत कायम करण्याची मागणी
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट शमत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. परंतु, कोरोनात नोकरी मिळालेल्या आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची चिंता वाढत आहे. गतवर्षी रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर अचानक या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले होते. त्यादृष्टीने सध्या त्यांची चिंता अधिक वाढली आहे.
गतवर्षी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले. कंत्राट संपल्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून अचानक कमी करण्यात आले होेते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नोकरीसाठी आंदोलन करावे लागले. यंदा फेब्रुवारीत कोरोनाची दुसरी लाट वाढू लागल्याने या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर रुजू करून घेण्यात आले आहे. सध्या काही कंत्राटी कर्मचारी शासकीय रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांची सेवा करीत आहेत, तर काहींची नियुक्ती ही कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली आहे. आता बाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे काही ठिकाणचे कोविड सेंटर बंद पडण्याची शक्यता असून, नोकरीची चिंता या कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागली आहे.
बाॅक्स
९ सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्ण नाहीत.
* कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात जवळपास २८ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते.
* जिल्ह्यातील २८ पैकी १९ कोविड सेंटरमध्ये सध्या बाधित रुग्णांना ठेवण्यात आले आहेे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
* जिल्ह्यातील जवळपास ०९ काेविड केअर सेंटरमध्ये बाधित रुग्ण नाहीत. त्यामुळे हे सेंटर सुरू राहणार की बंद, हा प्रश्न सद्यस्थितीत उपस्थित झाला आहे.
बॉक्स
अशी आहे आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण कोविड केअर सेंटर २८
नेमलेला कंत्राटी स्टाफ ११००
रुग्ण असलेले सेंटर १९
रुग्ण नसलेले सेंटर ०९
कोट
वेळ पडली की बोलावले, नंतर हाकलले !
1. कोरोनाकाळात नियमित कर्मचाऱ्यांसोबतच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रुग्णांची सेवा केली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झाली तरी जिल्हा प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करू नये, रिक्त पदांवर नियुक्ती द्यावी.
- नेहा भजगवरे.
2. गतवेळी अचानक कामावरून कमी करण्यात आले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागले. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करु नये.
- वर्षा मेश्राम
3. केंद्र शासनाने कोविडमध्ये शंभर दिवस काम केले असेल, तर सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या आपत्तीच्या काळात कंत्राटी कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. त्यामुळे शासनानेही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा चांगला विचार करावा.
- आकाश पाटील.
०००००००००००००००००००००००
(दुसरी असायमेंट आहे)
कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर साहित्यही गायब; १३ पेक्षा जास्त तक्रारी
सुपर, इर्विनमध्ये तक्रारी, दागिने, पैशांचे पाकीट, मोबाईल चोरले
अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. या काळात डॉक्टर, परिचारिका उपचारात व्यस्त होते. मात्र, अटेन्डंट व स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीचे काही कर्मचारी दगावलेल्या रुग्णांचे साहित्य चोरत होते. यासंदर्भात सुपर स्पेशालिटी, जिल्हा सामान्य रुग्णालयात जवळपास १३ वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसंबंधी सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात झाली. परंतु, एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या वाढताच इर्विन, सुपर स्पेशालिटी, कोविड केअर हॉस्पिटलमध्ये असलेल्या खासगी कोविड रुग्णालयात बेड मिळणेही कठीण झाले होते. सुपर स्पेशालिटीमध्ये तर एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवून उपचार करण्याची वेळ आली. डॉक्टरांपासून ते अधिकाऱ्यापर्यंत सर्वच राबत होते. मात्र, रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी व रुग्णांच्या मदतीसाठी नेमतेल्या कंत्राटी कंपनीचे काही कर्मचारी चोरटे निघाले. याचा मनस्ताप मृताच्या नातेवाइकांसोबतच रुग्णालय प्रशासनालाही झाला. या प्रकारच्या इर्विनशी संबंधित चार ते पाच, तर सुपर स्पेशालिटीशी संबंधित सहा ते सात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने आपल्या स्तरावर कारवाईकरीता संबंधित नातेवाइकांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले होते.
बॉक्स
बोटातील अंगठीही काढली
सुपर स्पेशालिटीमध्ये कोरोना मृताच्या नातेवाइकाने सांगितले, रुग्णालयातून प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून मृतदेह थेट स्मशानात नेल्यावर तिथे अंत्यसंस्कार करताना आईच्या बोटातील अंगठी गहाळ असल्याचे लक्षात आले. तिचा मोबाईलही मिळाला नाही. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
--------------
बॉक्स
कपडेही सोडले नाही.
अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने भावाला नेसत्या वस्त्रांवरच सुपर स्पेशालिटीमध्ये भरती केले. दुसऱ्या दिवशी नव्या कपड्यांची बॅग अटेन्डंटकडे सोपविली. तिसऱ्या दिवशी भावाचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्या अंगावर जुनेच कपडे होते. नव्या कपड्यांची पिशवी, त्यांचे पैशांचे पाकीट गायब झाले होते. यासंदर्भात रुग्णालयात तक्रार केली असल्याचेही एका नातेवाइकाने सांगितले.
-------------
बॉक्स
एकूण कोरोना रुग्ण -------------
बरे झालेले रुग्ण -------------
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण-----------
मृत्यू --------------