लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध घटकांकडून पत्रकारांवर होणारे हल्ले चिंताजनक आहेत. शासनाने पत्रकारांवरील हल्ल्यांच्या संरक्षणासाठी कायदे तयार केले असले तरी त्याकरिता जिल्हास्तरावर स्वतंत्र समिती गठित करून पत्रकारांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी सोमवारीे स्पष्ट केले.एका खासगी वाहिनींच्या प्रतिनिधींवर २५ आॅगस्ट रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकार संघटना आदींनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी बांगर यांनी माध्यमांवरील होणारे भ्याड हल्ले समाजासाठी घातक आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले योग्य नसून, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राखले गेलेच पाहिजे. तसेच या प्रकरणात स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन देखील जिल्हाधिकारी बांगर यांनी यावेळी दिले. याप्रकरणी पोलीस आयुक्तांशी स्वत: बोलणार असून, हल्ले करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या जातील. पत्रकार संघटनांनी मागण्यांबाबत दिलेले निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठविले जाईल. यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी जिल्हयातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.धक्काबुक्कीप्रकरणी आणखी तिघांना अटकश्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील आॅडिटोरियम हॉलमध्ये वाहिनीच्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी पत्रकार राहुल झोरी (रा. प्रभादेवी, मुंबई) यांना धक्काबुक्की करीत जिवे मारण्याची धमकी दिली. राजापेठ पोलिसांनी सात ते आठ शिवसैनिकांविरुद्ध गुन्हे नोंदविले, तर रविवारी सुनील लक्ष्मण राऊत, विजय पूरणलाल खत्री व विशाल सुधाकर बोबडे अटक केली. थेट प्रसारण होत असताना हा प्रकार देशभरात नागरिकांनी पाहिला. दरम्यान, यावेळी जखमी झालेले सुरेंद्र आकोडे यांना दोन दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयातून सुटी मिळाली.‘त्या’ घटनेचा युवा स्वाभिमान पार्टीतर्फे निषेधयुवा स्वाभिमान पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून घटनेचा निषेध नोंदविला. पत्रकारांवर हल्ले करण्यास गुंडांना चिथावणी देणाºया नेत्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.
पत्रकारांचे संरक्षण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 9:33 PM
सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विविध घटकांकडून पत्रकारांवर होणारे हल्ले चिंताजनक आहेत. शासनाने पत्रकारांवरील हल्ल्यांच्या संरक्षणासाठी कायदे तयार केले असले तरी त्याकरिता जिल्हास्तरावर स्वतंत्र समिती गठित करून पत्रकारांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी सोमवारीे स्पष्ट केले.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी :माध्यम प्रतिनिधींवरील हल्ल्याचा नोंदविला निषेध