शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
4
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
5
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
6
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
7
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
8
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
9
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
10
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
11
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
12
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
13
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
14
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
16
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
17
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
18
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
19
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
20
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला

'शकुंतला"च्या प्रवासाला 'ब्रेक'; 2 मेपासून फेरी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 7:57 PM

सुरक्षा व डागडुजीचे काम पूर्णत्वास न गेल्याने अचलपूर ते मूर्तिजापूर अशी धावणारी शकुंतला रेल्वे २ मेपासून बंद करण्यात आली आहे.

दर्यापूर (अमरावती) : सुरक्षा व डागडुजीचे काम पूर्णत्वास न गेल्याने अचलपूर ते मूर्तिजापूर अशी धावणारी शकुंतला रेल्वे २ मेपासून बंद करण्यात आली आहे. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ही रेल्वेगाडी बंद राहील, असा फलक स्थानिक रेल्वे फलाटावर लागला आहे. 

 स्वातंत्र्यपूर्व काळापासून धावत असलेल्या शकुंतला रेल्वेगाडीचे वर्तमान अस्वस्थ करणारे आहे. अशातच आठवड्यापूर्वी झालेल्या एका अपघाताचे निमित्त करून ही रेल्वे कायमची बंद करण्याचा घाट तर रचला जात नसावा ना, अशी शंका दर्यापूरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. या रेल्वेगाडीत कुठलीही सुधारणा न करता क्रमाक्रमाने तिचा प्रवास थांबविण्याचा प्रयत्न होत आहे.  सुरुवातीला दोन फेऱ्यांच्या जागी एक फेरी करण्यात आली. नंतर छोटे थांबे बंद केले. रेल्वे फाटक मानवविरहित केले. मागोमाग बनोसा, दर्यापूर व अंजनगाव स्थानक बंद केले. सहा डब्यांची शकुंतला रेल्वे ही आता तीन डब्यांवर आली आहे. 

मूर्तिजापूर-यवतमाळ फेरी बंद

शकुंतला रेल्वेचाच भाग असणारी, मूर्तिजापूर ते यवतमाळ धावणारी फेरी दोन वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. ती फेरी सुरू करण्याबाबत कुठल्याही हालचाली होत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेली नाही. अचलपूर ते यवतमाळ या १९० किमी रेल्वे मार्गावरील वाहतूक आता बंद झाली आहे. 

''लाकडी स्लिपर जळाल्याने शुकंतला रेल्वेची वाहतूक वरिष्ठांच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आली. कामे पूर्ण झाली आहेत. वरिष्ठांचे आदेश प्राप्त होताच रेल्वे पूर्ववत सुरू करू.''- मनोज त्रिपाठी, (सहाय्यक मंडळ अभियंता, रेल्वे विभाग)

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र