मंतरलेले क्षण : दीक्षांत समारंभाला चारचांद अमरावती : पदवी घेतल्याचा आनंद, तर कुणलाही सुवर्ण पदकांचा मिळालेला मान, भेटलेले जुने मित्र, आणि जुन्या सुखद आठवणी अशा वातावरणात विद्यार्थी आत रममान झाले. हातात पदवी घेऊन छायाचित्र आणि सेल्फी घेण्याची हौस पूर्ण होताच ‘कुछ कर दिखाना है’ अमरावती विद्यापीठाचा लौकिक नक्कीच वाढवू, प्रतिक्रिया आपसुकच विद्यार्थ्यांमधून व्यक्त झाल्या. निमित्त होते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत समारंभाचे. पदवीसाठी व सुवर्ण पदक व अन्य पुरस्कर्त्यांनी शनिवारी विद्यापीठात गर्दी केली. सकाळी ९ वाजतानंतर कॅम्पस विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेला. विद्यार्थी हव्या त्या पदवी कोटमध्ये छायाचित्र काढून घेत होते. काही विद्यार्थी माता-पित्यांसमवेत तर काही विद्यार्थिनी आपल्या पती-मुलांसह पदवी व अन्य पारितोषिके घेण्यासाठी आल्या होत्या.लक्ष्यवेधी दीक्षांत मिरवणूक अमरावती : शनिवारी सकाळी मुख्य सभारंभापूर्वी ९.५७ मिनिटांनी दीक्षांत मिरवणूक निघाली. विद्यापीठातील प्रशासकीय धुरिणांसह प्रो.जी.डी. यादवसुद्धा यात सहभागी झाले. त्यानंतर १० वाजून ७ मिनिटांनी दीक्षांत समारंभाला औपचारिक सुरुवात झाली. शनिवारी १०.१० मिनिटांनी दीक्षांत समारंभात सर्वप्रथम अचार्यधारकांना ‘पीएचडी’ प्रदान करण्यात आली. ३०० पेक्षा अधिक संशोधकांना पीएचडी प्रदान करतेवेळी खरेच या दीर्घ संशोधनाचा लाभ विद्यापीठ किंवा समाजाला होता काय, अशीच चर्चा आहे.
आनंद यशाचा, वेध भविष्याचा
By admin | Published: February 21, 2016 12:08 AM