शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

तरुणाईचा जल्लोष, उत्साह... युवा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 11:22 PM

 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे बुधवारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात थाटात उद्घाटन करण्यात आले. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाला पहिल्यांदाच महोत्सवाचे यजमानपद मिळाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे बुधवारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात थाटात उद्घाटन करण्यात आले. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाला पहिल्यांदाच महोत्सवाचे यजमानपद मिळाले आहे. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  समारंभाला आमदार सुलभा खोडके, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे प्रमुख पाहुणे, कुलसचिव तुषार देशमुख, मुख्य संयोजक प्राचार्य रामेश्वर भिसे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक राजीव बोरकर, महोत्सवाचे समन्वयक सुभाष गावंडे, सहसमन्वयक वैशाली देशमुख, युवा महोत्सव निवड समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल गवई, सदस्य जयश्री वैष्णव, निखिलेश नलोडे, रेखा मग्गीरवर, गजानन केतकर प्रामुख्याने उपस्थित होते.

जग संकुचित होत चालले : हर्षवर्धन देशमुखआपण अजूनही कोविडच्या छायेतून बाहेर निघालो नसून आभासी दुनियेमुळे एकमेकांपासून दूर जात आहोत. जग संकुचित होत चालले आहे, आपण स्वतःच्या व परिवाराच्या पलीकडे बघायला तयार नाही. सर्व करतो; पण काहीच करीत नाही, अशी आपली अवस्था असून, यातून बाहेर काढण्यासाठी युवा महोत्सवाची गरज असल्याचे प्रतिपादन उद्घाटक आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले.

विद्यापीठाचे कर्तव्य माणूस घडविणे : डॉ. दिलीप मालखेडेविद्यापीठाचे काम केवळ शिक्षण देणे नसून माणसे घडविणे हे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी आवश्यक आहे. अमरावती विद्यापीठ हे काम सातत्याने करीत असल्याचे प्रतिपादन उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी केले. केवळ विद्यापीठच नव्हे, तर प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी एक दालन असावे, तेथे विद्यार्थ्यांचा कायम सराव चालावा, याची आज गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. 

पत्रिकेतून गाडगेबाबांचे छायाचित्र गायबविद्यापीठाच्या कार्यक्रम पत्रिकेत संत गाडगेबाबा यांचे छायाचित्र नाही, शिवाय विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी प्रास्ताविकात संत गाडगेबाबा यांचा उल्लेख टाळला. ही ‘ॲलर्जी’ का, असा सवाल उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोरील गाडगेबाबांची दशसूत्री हटविल्याचा मुद्दा गाजला होता.लोकनृत्य, एकांकिका, वादविवाद स्पर्धेने मने जिंकलीयेथील पीडीएमसी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कलावंत विद्यार्थ्यानी लोकनृत्याचे बहारदार सादरीकरण केले. बुधवारी युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी लोकनृत्यानंतर एकांकिका, समूहगान, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कोलाज कला प्रकार, पाश्चिमात्य वाद्य संगीत, एकल गायन अशा विविध कला प्रकाराचे कलावंत विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. 

टॅग्स :universityविद्यापीठ