लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पर्यटनस्थळावरील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत जंगल सफारीला व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी गुरुवारी आदेश जारी केले.
मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी यासंदर्भात पत्र दिले होते. लॉकडाऊनमुळे जंगल सफारी बंद असल्याने गाईड व वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली होती. यामुळे सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये पर्यटकांसाठी चिखलदरा पर्यटनस्थळ खुले करण्यात आले आहे.
सुशिक्षित बेरोजगारांचे हाल आणि कोरोना रुग्णांची संख्या घटलेली पाहता, शेकडो किलोमीटर दुरून येणाऱ्या पर्यटकांसाठी जंगल सफारी सुरू करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यांना आदेश जारी झाले आहेत, याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया आमदार राजकुमार पटेल यांनी दिली.