शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

१० हजारांची स्विकारली लाच, समाजकल्याणमधील ‘सत्यवान बाबू’ ट्रॅप

By प्रदीप भाकरे | Published: July 04, 2023 5:45 PM

रंगेहाथ अटक : अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

अमरावती : येथील समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या इतर मागास, बहुजन कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपसंचालक कार्यालयातील कनिष्ट लिपिकाला दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ जुलै रोजी त्याला त्याच्याच कार्यालयात ट्रॅप केले. सत्यवान रामचंद्र बांबोर्डे (५३) असे लाचखोर कनिष्ट लिपिकाचे नाव आहे.

तक्रारदार यांची पत्नी समाज कल्याण विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या श्री गोविंद गुरुकुल आश्रम शाळा रिद्धपूर या संस्थेमधून ३१ जुलै रोजी अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर मिळणारे लाभ, जीपीएफ व पदोन्नती बिल मिळण्यासाठी तक्रारदाराने गतवर्षी अर्ज केला. त्या बिलाबाबत विचारणा केली असता बांबोर्डे याने बिल लवकरात लवकर मिळवून देण्याकरिता १२ हजार रुपये लाचेची मागणी केली. पडताळणीदरम्यान बांबोर्डे याने तडजोडीअंती पहिला टप्पा १० हजार रुपये व बिल मंजूर झाल्यावर दोन हजार रुपये असे लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यामुळे मंगळवारी एसीबीने त्याच्याच कार्यालयात सापळा रचला. आरोपीने ती रक्कम पंचासमक्ष स्विकारली. आरोपीविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कार्यवाही

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, उपअधीक्षक शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक केतन मांजरे यांच्या नेतृत्वातील अंमलदार वैभव जयाले, युवराज राठोड, राहुल वंजारी, विनोद धुळे, नितेश राठोड, चालक पोउपनि सतीश किटुकले आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीBribe Caseलाच प्रकरण