शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

कोकिळा व्रतासाठी जिवंत कोकिळेला केले कैद

By admin | Published: August 29, 2015 12:38 AM

कोकिळा व्रतासाठी जिवंत कोकिळा पक्ष्याला कैद करून आराधना केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री ८.३० वाजता भाजीबाजार परिसरात उघडकीस आला.

भाजीबाजार परिसरातील प्रकार : वनविभाग, पक्षीप्रेमींनी घेतली दखलअमरावती : कोकिळा व्रतासाठी जिवंत कोकिळा पक्ष्याला कैद करून आराधना केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री ८.३० वाजता भाजीबाजार परिसरात उघडकीस आला. याबाबत वनविभाग व पक्षीप्रेमींनी दखल घेऊन अविनाश पाठक यांची चौकशी केली. कोकिळा पक्ष्याला वनविभागाने ताब्यात घेतले असून तिच्यावर औषधोपचार सुरु केला आहे. कोकीळा व्रत हे दर दहा वर्षांनी येत असल्यामुळे महिला विशेष आस्थाने हे व्रत करतात, सुख - समृध्दी, व दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत केले जाते, या अनुषंगाने शहरातील बहुतांश स्त्रिया कोकिळा व्रत करीत आहेत. आता कोकिळा व्रत करण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे स्त्रियांमध्ये कोकिळा व्रताची ओढ वाढली आहे. या व्रताच्या अनुषंगाने गुरुवारी भाजीबाजार परिसरातील रहिवासी अविनाश पाठक (५५) यांच्या घरी कोकिळेला पिंजऱ्यात कैद स्थितीत वनविभागाला आढळून आली. अविनाश पाठक यांच्या घराजवळील एका वृक्षावर कावळ्याने कोकिळेला जखमी केले. कोकिळा जखमी होऊन पाठक यांच्या घरावर पडली होती. त्यांनी कोकिळेवर घरगुती उपचार करुन पिंजऱ्यात कैद केले. त्यातच कोकिळा व्रत सुरु असल्यामुळे कोकिळेची आराधना सुरु केली. त्यांनी कोकिळेला देवघरात स्थान देऊन पूजा-अर्चना सुरु केली. ही बाब परिसरातील अन्य स्त्रियांना माहिती होताच अनेक स्त्रिया कोकिळेच्या दर्शनासाठी पाठक यांच्या घरी गेल्यात. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच पक्षीप्रेमी राघवेंद्र नांदे यांना समजली. याबाबत त्यांनी वनविभागाला माहिती देऊन पाठक यांचे घर गाठले. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे, बारब्दे, खैरकर, नीलेश करवाळे, वनरक्षक खराते यांच्यासह राघवेंद्र नांदे व नागपुरी गेट पोलिसांनी पाठक यांचे घर गाठून पाहणी केली. त्यावेळी पाठक यांच्या देवघरात ठेवलेल्या पिंजऱ्यात कोकिळा आढळून आली. वनविभागाने पाठक यांच्यासह कुटुंबीयांची चौकशी करुन कोकिळेला ताब्यात घेतले. या घटनेमुळे भाजीबाजार परिसरात खळबळ उडाली होती. वनविभागाने कोकिळेला वडाळी वनविभागात ठेवले असून तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरु केले आहे. (प्रतिनिधी )