लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : दहीहंडा मार्गावरील सद्गुरू जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत जवळपास २ कोटी ८५ लाखांचा कापूस जळून भस्मसात झाला.जिनिंगमध्ये खरेदी केलेल्या कापसाचे वजन करून मिनी ट्रक माघारी येत असताना ट्रकच्या सायलेन्सरमधून उडालेली ठिणगी बाजूलाच असलेल्या गंजीवर उडाल्याने क्षणार्धात कापसाने पेट घेतला. हवेचा झोत जिनिंगकडे असल्याने क्षणार्धात बाजूच्या गंजीलाही आग लागली. जिनिंगच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ दूरध्वनीवरून नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती कळविली. अग्निशामक बंब पोहोेचेपर्यंत आगीने भीषण रूप धारण केले होते. अकोट व अंजनगाव येथूनही अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले. आगीत पाच हजार क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामुळे जवळपास २ कोटी ८५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिनिंगचे संचालक सुधाकर पाटील भारसाकळे यांनी दिली. ठाणेदार ठाकरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
दर्यापूरच्या जिनिंगला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 1:01 AM
दहीहंडा मार्गावरील सद्गुरू जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत जवळपास २ कोटी ८५ लाखांचा कापूस जळून भस्मसात झाला.
ठळक मुद्देकापूस भस्मसात : सायलेन्सरची ठिणगी कारणीभूत