लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटीचासंप अजूनही पूर्ण मिटलेला नाही. २८१ कर्मचारी कामावर आले असले तरी अमरावती विभागात बस जवळपास तीन आठवड्यांपासून जागीच उभ्या आहेत. त्यामुळे ऑईल गोठून इंजिन लॉक आणि टायर खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दसरा-दिवाळी सणापासून प्रवाशांची संख्या वाढू लागली. मात्र, विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अमरावती विभागात गत तीन आठवड्यांपासून एसटी बस गाड्या बंद आहेत. परिणामी तीन आठवड्यांपासून बस आगारातच थांबल्या आहेत. सर्व एकाच जागेवर आगारात उभी असल्याने टायर खराब तसेच एअर बॉक्स खराब होण्याचा धोका वाढला आहे. बॅटरी डाऊन होत आहेत. अनेक समस्या समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.केवळ २८१ कर्मचारी कामावर- एसटीच्या अमरावती विभागात २४४६ कर्मचारी आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ २८१ कर्मचारी कामावर हजर झाले तसेच इतर कर्मचारी संपात सहभागी आहेत, हे सर्व कर्मचारी मागणीवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात सहा फेऱ्या परिवहन मंत्र्यांकडून वेतनवाढ जाहीर करण्यात आली. यानंतर २४४६ पैकी केवळ २८१ कर्मचारी रुजू झाले आहेत, तर २ हजार १६२ कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. कामावर न परतल्यास पुनर्विचार करण्याचा इशारा दिल्यानंतरही २८१ कर्मचारी कामावर परतले. या कर्मचाऱ्यांमध्ये चालक-वाहकांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे आजमितीस केवळ सहा फेऱ्याच सोडण्यात येत आहेत.
मेंटेनन्सवर होणार लाखोंचा खर्च
जिल्ह्यातील बस आगारात थांबून आहेत. त्यातील बहुतांश गाड्यांच्या बॅटरीही बंद पडण्याची भीती आहे, तर टायर खराब होण्याच्या ही समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, बस उभ्या असल्या तरी दररोज गाड्यांचे देखभाल व चालू बंद केली जात आहे. तूर्तास गाड्यांची स्थिती चांगली असल्याचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.
३६० जणांवर कारवाई- संपकरी एसटी कर्मचारी कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. - गत काही दिवसांमध्ये ३०६ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.- यामध्ये एसटी चालक-वाहक व आगारातील अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.- आतापर्यंत ३६० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.