परतवाडा (अमरावती) लोकमत न्यूज नेटवर्क नरेंद्र जावरे
मेळघाटच्या हरिसाल येथील दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्यभरातील वनाधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी तैनातिच्या ठिकाणी कार्यालय व जंगलात काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदवित जस्टीस फॉर दिपाली चे नारे लावले, तर या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियावरील फेसबुक व्हाट्सअप डीपी वर जस्टीस फॉर दीपालीचे बॅनर लावून काळा दिवस साजरा केला
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा गुगामल वन्यजीव विभागाअंतर्गत हरिसाल वन परिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक विनोदच शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती या संतापजनक घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहे विविध संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असतानाच सहकारी खात्यातील वनाधिकारी वनकर्मचारी , महिला वन कर्मचारी वनमजूर आदी पूर्णता एकवटले आहे गत पाच दिवसापासून विविध स्तरावर निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार व त्याला पाठीशी घालणारा तत्कालीन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर कठोर कारवाई साठी आंदोलने सुरू आहेत
मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा कार्यालयात उपवनसंरक्षक पियुषा जगताप, कार्यालयीन प्रकाश गोळे ,प्रवीण सोलव वनरक्षक वनपाल संघटनेचे अध्यक्ष प्रदीप बाळापुरे, रेंजर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन वनकर्मचारी , तथा किशोर पोहणकर राज्य अध्यक्ष व संघटनेचे सर्व राज्यस्तरीय पदाधिकारी कोल्हापूर औरंगाबाद गडचिरोली राज्यभरातील इतर वन वृत्तातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला
बॉक्स
रेड्डी ,विनोद शिव कुमार च्या कार्यालयातही निषेध
बुधवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट, गुगामल, सिपना, मेळघाट वन्यजीव प्रादेशिक तसेच या अंतर्गत येणाऱ्या सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रमाणेच कालपर्यंत आपली हुकूमशाही गाजविणाऱ्या श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार निलंबना पूर्वी पर्यंत कार्यरत असलेल्या अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक कार्यालयासह अमरावती व चिखलदरा गुगामल वन्यजीव विभागात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळा किती लावून निषेध नोंदविला
बॉक्स
सोशल मीडियावर काळा दिन
वन विभाग व व्याघ्रप्रकल्पातील राज्यभरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी सोशल मीडियावरील आपल्या फेसबुक आणि व्हाट्सअप अकाउंट वर जस्तीस फार दिपाली असे बॅनर लावून काळा दिन निषेध नोंदविला त्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र काळे चित्र होते क्षेत्रीय कार्यालयीन महिलांनी वन कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला