लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तळागाळातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी निरंतर कार्य करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांनी माळी समाज युवक महामेळाव्यात दिली.आपण विजयी झाल्यास क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी संसदेमध्ये करू, असे राणा म्हणाल्या. जिल्ह्यातील गोरगरीब मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी अमरावती येथे ५० लाख खर्चून महात्मा ज्योतिबा फुले भवन बनविणार असल्याचे नवनीत म्हणाल्या. यासाठी एकदा संधी द्यावी, असे आवाहन नवनीत राणा यांनी केले. यावेळी डॉ. सचिन भाले, हरीश चरपे, नाना आमले, पवन हिंगणे, योगेश पडार, प्रीतम लांडे, विनायक देशमुख, अशोक खटाळे, मनोज अंबाडकर, अर्चना नवले, मयूर चरपे, सुरेश श्रीखंडे, चेतन गावंडे, नीलेश नागापुरे, दिलीप लोखंडे, संतोष चिंचोळकर आशिष बेलोरकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, रिपाइं (गवई), युवा स्वाभिमानचे पदाधिकारी उपस्थित होते.
ज्योतिबा, सावित्रीबार्इंचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 1:26 AM