जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र : अन्यायाविरुद्ध स्थानिक कामगारांची गांधीगिरी अमरावती : कार्यरत कामगारांच्या समस्या ‘जैसे थे’ असल्याने रतन इंडिया औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील कर्मचारी, कामगारांनी ४ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला.गुरुवारी या संदर्भात रतन इंडिया पॉवर लि. विरोधात शिव कामगार सेनेने जिल्हाधिकाऱ्यांसह सहाय्यक कामगार आयुक्तांची भेट घेतली. १ मार्चला निवेदन दिल्यानंतर ८ मार्चला या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, कामगार आणि रतन इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. यात रतन इंडियाने ३१ मार्चपर्यंत कामगारांच्या सर्व समस्या निकाली काढाव्यात, असे आदेश रतन इंडियाला दिले होते. यात कामगारांचे अल्पवेतन, भेदभाव, कामाच्या वेळा व अन्य समस्यांचे प्रतिबिंब होते. रतन इंडिया औष्णिक विद्युत प्रकल्पात आम्हाला वेठबिगारासारखी वागणूक मिळते, असा स्थानिक कामगारांचा आरोप होता. ३१ मार्च उलटून गेल्यावरही रतन इंडिया व्यवस्थापनाने कुठल्याही समस्या सोडविल्या नाही आणि या संदर्भात व्यवस्थापने कामगारांना काहीही कळविले नाही. यामुळे या प्रकरणी आपण लक्ष घालावे आणि न्याय द्यावा, अन्यथा आम्ही ४ एप्रिलपासून रतन इंडिया व्यवस्थापनाविरोधात बेमुदत कामबंद आंदोलन करु असा इशारा अमोल इंगळे, पंकज देशमुख, दीपक गोफणे, भूषण मारोडकर, राहुल नाफाडे, प्रमोद वानखडे, आशा राऊत, श्रीकांत देशमुख, संदीप तिहिले, विलास खोजे, पंडित भगत व अन्य कामगारंनी दिला आहे. या स्मरणपत्राच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अन्य मंत्र्यांसह उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना दिले. तसेच रतन इंडिया पॉवर लिमिटेडच्या व्यवस्थापकासह माहुली जहांगीरच्या ठाणेदारांना देण्यात आले आहे. सन इंडियामधील या बाबींवर बोट सन इंडियात कार्यरत स्थानिकांना एपीएफचा फायदा मिळत नाही. परप्रांतिय कर्मचाऱ्यांना भरमसाठ वेतन, स्थानिकांना कमी वेतन, रोजंदारी वाहन चालक, रोजंदारीच , पगारामध्ये प्रचंड तफावत, कर्मचाऱ्यांची नियुक्ती तारखेत वारंवार बदल, पगारवाढीपासून कामगार टूर, कंपनीकडून गैरवर्तणूक, अनियमितवेतन,
रतन इंडियात ४ एप्रिलपासून कामबंद आंदोलन
By admin | Published: April 01, 2016 12:34 AM