शालेय शिक्षण विभागाने घेतली दखल,
कुऱ्हा : गतवर्षी ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना उजळणीसाठी सेतु अभ्यास (ब्रीज कोर्स )शालेय शिक्षण विभाग अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ४५ दिवसांकरिता राबविण्यात येत आहे. अशोक शिक्षण संस्था, अशोकनगरद्वारा संचालित अंजनसिंगी येथील श्री कान्होजीबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने १६ मे ते ६ जून दरम्यान २१ दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास व स्पर्धा परीक्षा आॕॅनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्या कार्यशाळेसंबंधी विविध दैनिकांमधून प्रकाशित वृत्त महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागांद्वारे आयोजित सेतु अभ्यास (ब्रीज कोर्स) च्या ‘बातमी लेखन’ या संकल्पनेत इयत्ता दहावीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थांना घटना, प्रसंग, स्वानुभव यांचे लेखन करता यावे तसेच लेखन क्षमता व कौशल्य विकसित करण्याच्या हेतुने राज्यभरातील सेतु अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष सुधीर शेंडे, ज्येष्ठ संचालक वसंतराव गुल्हाने, गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर व प्राचार्य बी.एम गाढवे यांची छायाचित्रे त्यात आहेत. अतुल ठाकरे, दीपक अंबरते, प्राचार्य प्रतिभा काळमेघ (बाभूळगाव) यांनी या कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले. वृत्तलेखन दीपक अंबरते यांनी केले होते. या यशाबाबत शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.