उत्पन्नाचे नवे स्त्रोत : नगरसेवकांच्या अपेक्षाअमरावती : महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. मार्च महिना संपण्यास काही दिवसांचा अवधी असला तरी बजेटमधील तरतुदींवर प्रशासनात चांगलाच काथ्याकूट सुरू आहे. यासंदर्भात स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी मंगळवारी अंदाजपत्रकाच्या विषयावर सभेचे आयोजन केले आहे. ते त्यात काही दुरुस्त्या सुचवतील, अशी शक्यता असल्याने प्रशासन काय भूमिका मांडते, याकडे लक्ष लागले आहे. महापालिकेत काँग्रेस आणि राकांफ्रंटची सत्त आहे. पुढील वर्षी पालिकेची सार्वात्रिक निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळेही या अर्थसंकल्पातील तरतुदींना महत्त्व प्राप्त झाले आहे. शहराच्या विकासासाठी अमृत योजना, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शौचालय उभारणीसह कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरासाठी निधी प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ असून या निधीचे योग्य विनियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. मालमत्ता कर आणि अन्य कराच्या रकमेतून येणाऱ्या मर्यादित उत्पन्नावर पालिकेला आर्थिक ताळबंदाचे गणित जुळवावे लागणार आहे. आयुक्त आग्रही रस्ते, नाल्या, पथदिव्यांसह घरकूल, स्वच्छतागृह आदीसाठी प्राप्त निधीतून दर्जेदार कामे व्हावीत, अशी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अपेक्षा आहे. त्यासाठी ते आग्रही असून तशा पद्धतीने प्रशासनाची वाटचाल सुरु आहे. ठोस उत्पन्न हवे ! मनपाची आर्थिक परिस्थित्रत जेमतेम आहे. अशा स्थितीत मनपा कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी ठोस उत्पन्नाचे पर्याय स्वीकारावे लागतील. या सर्व बाबींचे काटेकोरपणे नियोजन करून नगरसेवकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी अर्थ संकल्पात निधीची तरदूद करावी लागेल. पालिकेत तिजोरी सांभाळण्याचा मार्डीकरांना अनुभव आहे. त्यामुळे अत्यंत पारदर्शक आणि खर्च उत्पन्नाचा मेळ साधत ते अर्थसंकल्प मांडतील. - चरणजितकौर नंदा, महापौर, अमरावतीमहापालिकेची आर्थिक विपन्नावस्था दूर सारण्याकरिता अर्थसंकल्पातून उत्पन्नाचे नवे स्त्रोत मांडले जावेत. फुगून बेडूक झालेला अर्थसंकल्प नसावा, तर तो वस्तुनिष्ठ असावा. - प्रवीण हरमकर, विरोधी पक्षनेता
अर्थसंकल्पातील तरतुदीवरून काथ्याकूट!
By admin | Published: March 22, 2016 12:24 AM