लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गणेशोत्सव, दुर्गोत्सव, मोहरम यांसारख्या महत्त्वाच्या सण-उत्सवांसोबतच विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आदेश राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ यांनी गुरुवारी आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश सेठ गुरुवारी सकाळी शहरात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी जोग स्टेडियममधील सभागृहात विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे व विभागातील पाचही जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपअधीक्षकांची कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात बैठक घेतली. सण, उत्सव व निवडणुकीदरम्यान अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात काय, काय उपाययोजना करण्यात आल्या, याबाबतचा आढावा रजनीश सेठ यांनी यावेळी घेतला. अतिसंवेदनशील भागातील बंदोबस्त कसा राहील, याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली तसेच काळात कुठलीही अप्रिय घटना घडू नये, याची खबरदारी घेण्याचे रजनीश सेठ यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी निर्देश दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन., अकोल्याचे अमोध गावकर, बुलडाण्याचे दिलीप पाटील, वाशिमचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी व अमरावतीचे अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.शहराचा घेतला आढावाअमरावती परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांची बैठक आटोपल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दुपारी २ वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त संजय बाविस्कर, उपायुक्त प्रशांत होळकर, यशवंत सोळंके, शशिकांत सातव, सर्व सहायक आयुक्त व ठाणेदार उपस्थित होते. सक्रिय गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, अवैध धंद्याला आळा यावेळी अधिकाºयांना निर्देश देण्यात आले.
सण-उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 1:33 AM
अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश सेठ गुरुवारी सकाळी शहरात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी जोग स्टेडियममधील सभागृहात विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे व विभागातील पाचही जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपअधीक्षकांची कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात बैठक घेतली.
ठळक मुद्देरजनीश सेठ : अमरावती परिक्षेत्राचा आढावा सभेत पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश