शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

पॉस मशिनद्वारे मिळणार केरोसिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:04 PM

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अनुदानित केरोसिन शिधापत्रिकाधारकांना देण्याची तरतूद आहे. यासाठी राज्यभरात ६० हजारावर किरकोळ केरोसिन परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली. यामधून गॅस जोडणी शिधापत्रिकाधारकांना वगळण्यात आले असून अनुदानित केरोसिन पॉस मशिनच्या माध्यमातून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक वितरण व्यवस्थेचा निर्णय : गॅस जोडणीधारकांना वगळले

अनेकश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अनुदानित केरोसिन शिधापत्रिकाधारकांना देण्याची तरतूद आहे. यासाठी राज्यभरात ६० हजारावर किरकोळ केरोसिन परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली. यामधून गॅस जोडणी शिधापत्रिकाधारकांना वगळण्यात आले असून अनुदानित केरोसिन पॉस मशिनच्या माध्यमातून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून केरोसिन वितरणासाठी पॉस अर्थात पार्इंट आॅफ सेल डिवाइस यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधार क्रमांक जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांना केरोसिन मिळणार आहे. केरोसिन दुकानातील ई-पॉस मशिनद्वारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार अ‍ॅथेलीकेशन झाले असल्यास केरोसिन मिळणार आहे. ई-पॉस मशिनवर शिधापत्रिकेची माहिती उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका, आधार नोंदणी प्रत, शासकीय छायांकित ओळखपत्राच्या माध्यमातून केरोसिन उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. ज्या केरोसिन विक्रेत्याकडे ई-पॉस यंत्रणा बसविण्यात आली नाही. अशा विक्रेत्यांनी शिधापत्रिका धारकांकडून आधार क्रमांक, केरोसिन विक्रीबाबत पावतीवर लाभार्थ्यांचे नाव व शिधापत्रिकेचा क्रमांक नोंद करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या पावतीवर लाभार्थ्यांची स्वाक्षरी, त्याचबरोबर घोषणापत्र देखील केरोसिन विकत घेताना द्यावे लागणार आहे. गॅस जोडणी असल्यास शिधापत्रिकाधारकांना अनुदानित दराचे केरोसिन दिल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. बिगर गॅस जोडणी धारकांनाच केरोसिन मिळावे, हा यामागील हेतू आहे.यामुळे केरोसिन विक्रेते चांगलेच धास्तावले असून केरोसिन विक्रीची माहिती अद्यावत कशी ठेवावी, या चिंतेत सापडले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्न धान्य वितरण अधिकारी अथवा तहसीलकडे शिधापत्रिकेसोबत गॅस जोडणीची अधिकृत आकडेवारी नसल्याने ई-पॉस मशिनद्वारे विक्री करण्यास अडचण येण्याची शक्यता आहे.केरोसिन घेताना द्यावे लागेल हमीपत्रज्या शिधापत्रिका धारकाला केरोसिन विकत घ्यावे लागणार, अशा ग्राहकाला मी शिधापत्रिकाधारक असून माझ्या अथवा कुटुंबातील सदस्याच्या नावाने गॅस जोडणी नाही. जोडणी असल्यास अनुदानित केरोसिनचा लाभ घेणार नाही. असे हमीपत्र तहसीलदार यांचे समक्ष सादर करावे लागणार आहे. यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागणार असून वेळीच केरोसिन गरजूंच्या कामी कसे पडणार, याची काळजी शासनाला घ्यावी लागणार आहे.ग्राहक व विक्रेत्यात संघर्षाचे चिन्हसार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना उपलब्धतेनुसार वेळीच केरोसिन मिळत होते. आता मात्र ई-पॉस मशिनचा फतवा निघाला. हमीपत्रासह अन्य जाचक अटी विक्रेता व ग्राहकांवर नव्याने लादण्यात आल्या. ग्रामीण भागात आजही इंधनासाठी केरोसिनचा वापर केला जातो. सहज मिळणारे केरोसिन अटीच्या पूर्ततेनंतर मिळणार असल्याने विक्रेता व ग्राहक यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचे चिन्ह दिसून येणारा निर्णय ठरणार आहे.