शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

काळा बाजाराला चाप; 'पॉस'च्या वापरानं केरोसिनची मागणी घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 6:03 PM

सप्टेंबरमध्ये केरोसिनच्या मागणीत सात लाख लिटरनं घट

अमरावती : शासनाने आता परवानाधारक केरोसीन विक्रेत्यांकडून ‘पीओएस’ मशीनद्वारेच अनुदानित केरोसिन वितरणाचा निर्णय घेतल्यामुळे काळा बाजाराला चाप बसला आहे. पश्चिम विदर्भात ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात केरोसीनची मागणी तब्बल ७ लाख ६८ हजार लिटरने घटली आहे. गॅस जोडणीधारकांची खरी आकडेवारी मिळणे दुरापास्त असल्यामुळे पुरवठा विभागाने ‘पॉस’ मशीनद्वारेच केरोसीन वितरणाची पद्धती अवलंबली.सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अनुदानित दराचे केरोसिन ५९ हजार ५३५ किरकोळ परवानधारक विक्रेत्यांद्वारा राज्यातील ८८ लाख रेशन कार्डधारकांना वितरित करण्यात येते. यामध्ये ३६ हजार दुकानांमधून फक्त केरोसीन, तर २३ हजार रेशन दुकानांमधून धान्यासोबत केरोसिन वितरित करण्यात येते. दरम्यान, शासनाने गॅस जोडणी नसलेल्यांनाच अनुदानित केरोसिन वाटपाचा निर्णय घेतला. मात्र, गॅस जोडणीधारकांची अचूक माहिती प्राप्त होत नसल्याने रेशन कार्डावरील स्टॅम्पिंग करण्यात अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळे शासनाने आता पीओएस मशीनद्वारेच केरोसिन वितरणचा निर्णय घेतला. त्यामुळे ७.६८ लाख लिटर केरोसिनची बचत झाली आहे. रास्त भाव दुकानातील पीओएस मशीनवर कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला केरोसिनचे वितरण करण्यात येत आहे. आधार जोडणी झाली नसल्यास, त्याला ‘ईकेवायसी’ करून केरोसिनचे वितरण करण्यात येत आहे. शिधापत्रिकेची माहिती ई-पॉस मशीनवर उपलब्ध नसल्यास शासनप्रमाणित पर्यायी ओळखपत्राचा वापर करून केरोसिन वितरण करण्यात येत आहे.

विभागात आता पीओएस मशीनच्या वापराने केरोसिन वाटप करण्यात येत आहे. यामुळे काळाबाजाराला चाप बसला. एका महिन्यात ७.६८ लाख लिटर केरोसिनची बचत झाली आहे. - रमेश मावस्कर, विभागीय उपायुक्त (पुरवठा)

केरोसिनच्या मागणीतली तुलनात्मक स्थिती (किलोलिटर)जिल्हा     ऑगस्टचा कोटा     सप्टेंबरमधील मागणी        बचतअमरावती       ८४०                         ७२०                      १२०अकोला          ५८८                         १३२                     ४५६ वाशिम           ३००                         ३२३                      -२६              यवतमाळ       ५५२                         ४५६                      ९६बुलडाणा        ८२८                          ७०८                    १२०एकूण           ३१०८                        २३४०                   ७६८