बॉक्स
ही पहा आकडेवारी एप्रिल ते जुलै २०२१
शासकीय रुग्णालय नॉर्मल सिझेरियन
इर्विन रुग्णलय २ ०
अंजनगाव ग्रामीण रुग्णालय १०८ ०
भातकुली ग्रामीण रुग्णालय १८ ०
चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालय ८२ ०
चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालय ३३ ०
चिखलदरा ग्रामीण रुग्णालय १० ०
चुरणी ग्रामीण रुग्णालय २६ ००
धामणगाव ग्रामीण रुग्णालय ३० ०
नांदगाव खं. ग्रामीण रुग्णालय ३५ १
तिवसा ग्रामीण रुग्णालय १५ ०
वरूड ग्रामीण रुग्णालय ७९३ ४४५
अचलपूर उपजिल्हा रुग्णालय ९४२ ४२३
दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय १०९ ९
धारणी उपजिल्हा रुग्णालय २९६ ७०
मोर्शी उपजिल्हा रुग्णालय १६८ २०
डफरी रुग्णालय अमरावती २३८० १२७४
--
शासकीय रुग्णालयात नॉर्मल, खासगीत सिझेरियन
शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांकडे लक्ष दिले जात नसले तरी त्या महिलेची सामान्य प्रसूती व्हावी यासाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रयत्न केला जातो.
खासगी रुग्णालयात आलेल्यांची प्रसूती त्वरित केली जाते. यासाठी सिझेरियनचा आधारा घेतला जातो. रुग्णालयात बाळंतीण हजर झाल्यास अवघ्या तासभरात बाळ हातात ठेवले जाते.
खासगी रुग्णालयात आलेल्या बाळंतीनीच्या पोटात असलेल्या बाळाने पोटात ‘श‘ केल्यास मातेच्या व बाळाच्या जीवाला धोका आहे, असे दाखवून सिझेरियन केले जाते.
म्हणून शासकीय नको वाटते
सरकारी रुग्णालयातील डॉक्टर बाळंतिणींकडे लक्ष देत नाही. प्रसूतीच्या वेदना सुरू असतानाही फक्त एकदा तपासतात. त्यानंतर लक्ष देत नाही.
- मंदा चव्हाण,
भानखेडा बु.
--
शासकीय रुग्णालयातील बेडची व्यवस्था, दुर्गंधी तसेच बाळंतीण महिलेच्या जवळून होत असलेली माणसांची यं-जा यामुळे तेथे प्रसूतीसाठी महिलांचा नकार दिसून येतो.
- शारदा जगदाळे, विलासनगर
--
येथे रुग्णांची विशेष काळजी घेतली जाते. सामान्य कुटुंबातील बहुतांश महिलांची डफरीनमध्ये प्रसूती होत आहे. मातामृत्यू व बालमृत्यू टाळण्याच्या दृष्टीने प्रसूतीनंतर तीन महिन्यापर्यंत बाळंतीणची काळजी आरोग्य विभागाद्वारा घेतली जाते.
- विद्या वाठोडकर, अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय