अकोला: विदर्भात अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणारी खैरागड चषक क्रिकेट स्पर्धा-२0१५ ला रविवार २३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. विदर्भ क्रिकेट अकादमी, नागपूरच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, अकोला विभागातील अकोला, अमरावती, मलकापूर, वाशिम, बुलडाणा जिल्हा संघातील प्राथमिक फेरीतील सामने अकोला, अमरावती, मलकापूर येथे होणार आहेत. अकोला शहरामध्ये ४, अमरावतीमध्ये ५ आणि मलकापूर येथे एक सामना होईल. प्रत्येक सामना दोन दिवसीय राहील. रविवार २३ व २४ ऑगस्ट रोजी अकोला व वाशिममधील पहिला सामना अकोला येथे होईल. याचवेळी अमरावती येथे अमरावती व यवतमाळ संघात सामना होणार आहे. २६ व २७ ऑगस्ट रोजी मलकापूर येथे वाशिम आणि बुलडाणा संघात तर अमरावती येथे यवतमाळ व अकोला संघात सामना होईल. २९ व ३0 ऑगस्ट रोजी अकोला येथे अमरावती व बुलडाणा संघादरम्यान आणि अमरावती येथे यवतमाळ व वाशिम संघात सामना होईल. १ व २ सप्टेंबर रोजी अकोला येथे बुलडाणा आणि यवतमाळ संघात आणि अमरावती येथे अमरावती व अकोला संघात सामना होईल. ४ व ५ सप्टेंबर रोजी अकोला येथे अकोला व बुलडाणा संघात आणि अमरावती येथे अमरावती आणि वाशिम संघात सामना ख्ोळला जाईल. उपान्त्यफेरीतील सामने आणि अंतिम सामना कोणत्या मैदानावर होईल, याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे अकोला जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी सांगितले.
*अकोला संघाचे नेतृत्व चैतन्यकडे
अकोला जिल्हा संघामध्ये कर्णधार चैतन्य हिरपूरकर, नयन चव्हाण, पवन परनाटे, बंटी क्षीरसागर, वैभव लांडे, अक्षय राऊत, गांधार घाडवे, इम्रान क माल, अक्षय शर्मा, भाग्येश मावळे, दिनेश केशवाणी, अमित कुलट, विशाल दळवी, स्वप्निल विंचणकर, मयूर बढे, रोशन चव्हाण, वैभव कोथमिरे, गोविंद घोगरे, रू पम गावंडे, क्रिष्णा टापरे, अमोल इंगळे, पंकज धोटे, अभिजित करणे, वैभव कुचके, अमोल नाईक, यकुबुद्दीन यांचा समावेश आहे. हाच संघ आगामी तेलंग ट्राफीदेखील खेळणार आहे.