आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनाची तयारी कृषी विभागाद्वारा सुरू झाली आहे. प्रस्तावित नियोजनानुसार जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टरमध्ये यंदा पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वाधिक दोन लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन तर दोन लाख १० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीचे क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. याविषयीचा संयुक्त स्वाक्षरी अहवाल कृषी संचालकांना पाठविण्यात आला.गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात पेरणीक्षेत्रात १० ते १५ टक्कयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाद्वारा नियोजन सुरू असले तरी यंदाचा पावसाळा कसा राहील, याविषयीचे कोणतेही अधिकृत भाष्य हवामान विभागाद्वारा करण्यात आलेले नाही. किबंहुना गतवर्षीच्या खरिपात हवामान विभागाचे सर्व अंदाज फोल ठरल्यानेच शेतकऱ्यांचा घात झाला व या विभागावर नामुष्की ओढावली असल्याचे वास्तव आहे.प्रस्तावित पेरणी क्षेत्राच्या नियोजनानुसार यंदा सर्वाधिक दोन लाख ९५ हजार हेक्टर सोयाबीनचे पेरणीक्षेत्र राहणार आहे. तूर एक लाख तीस हजार हेक्टर, संकरीत ज्वार २८ हजार हेक्टर, बाजरा १०० हेक्टर, मका ८ हजार हेक्टर, मूग ३३ हजार हेक्टर, उडीद ३० हजार हेक्टर, भुईमूग तीन हजार हेक्टर, सुर्यफूल १०० हेक्टर, तीळ २५० हेक्टर, संकरीत कपाशी एक लाख ८५ हजार हेक्टर, सुधारीत कपाशी पाच हजार हेक्टर, धान व इतर पिके १० हजार ६०० हेक्टरमध्ये राहणार आहे.यंदाच्या हंगामासाठी सार्वजनिकमधून ७१ हजार ४९० क्विंटल बियाण्यांची आवशक्यता आहे. यामध्ये ज्वार १,१५० क्विंटल, मका ५०, तूर तीन हजार, मूग ६००, उडीद एक हजार ६००, सोयाबीन ६५ हजार, संकरीत कपाशी १०, सुधारीत कपाशी १० व इतर पिकांसाठी ३० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. खासगीमधून एक लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. यामध्ये सर्वाधिक एक लाख ३२ हजार ७५० क्विंटल सोयाबीन, ६ हजार २४० क्विंटल तूर, दोन हजार ३४० क्विंटल उडीद, एक हजार ३८६ क्विंटल मूग व ६०० क्विंटल भुईमूग बियाण्यांची गरज आहे.असे लागणार बियाणेयंदाच्या खरिपासाठी एकुण एक लाख ५१ हजार ९९३ क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये २,८०० क्विंटल ज्वार, बाजरा चार, मका ८३२, तूर ६,२४०, मूग १,३८६, उडीद २,३४०, भुईमूग ६००,सुर्यफूल १०, तीळ १.५, सोयाबीन १,३२,६५०, संकरीत कपाशी ४,१६२, सुधारीत कपाशी ६०० व इतर पिकांचे २६७ किंटल बियाणे लागणार आहे.महाबीजकडे ६६,३९० क्विंटलची मागणीयंदाच्या हंगामासाठी ६६ हजार ३९० क्विंटलची मागणी महाबीजकडे नोंदविण्यात आली. यामध्ये संकरीत ज्वार १,१५० क्विंटल, मका ५०, तूर ३,०००, मूग ६००, उडीद १,५००, सोयाबीन ६०,०००, संकरीत कपाशी १० सुधारीत कपाशी १० व इतर बियाण्यांच्या ३० क्विंटलची मागणी करण्यात आलेली आहे. याव्यतिरीक्त उडीदाची १०० क्विंटल व सोयाबीनचे ५,००० क्विंटल बियाण्यांची मागणी ‘एनएससी’ कडे करण्यात आली.
यंदा सात लाख २८ हजार हेक्टरमध्ये खरीप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:08 PM
यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनाची तयारी कृषी विभागाद्वारा सुरू झाली आहे. प्रस्तावित नियोजनानुसार जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टरमध्ये यंदा पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देकृषी विभागाचे नियोजन : सर्वाधिक २.९५ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन