अमरावती : जिल्ह्यात पाच दिवसांपासून सातत्याने पाऊस येत असल्याने खरिपाच्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आलेला आहे. आतापर्यंत प्रस्तावित ६,९८,७९६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६,१३,६८० हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही ८७.८२ टक्केवारी आहे. यात सर्वाधिक २,३८,३५२ हेक्टर सोयाबीन व २,१०,६९२ हेक्टर कपाशीचे पेरणी क्षेत्र आहे.
जूनच्या ३० तारखेपासून ९ जुलैपर्यंत पावसाने ओढ दिल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या होत्या, तर खरिपाची अर्धेअधिक पेरणी रखडली होती. यात किमान २५ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे सावट असताना ९ जुलैपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकट टळले. याशिवाय पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांनादेखील गती आलेली आहे.
कृषी विभागाच्या बुधवारच्या अहवालानुसार धारणी तालुक्यात ३६,८८० हेक्टर, चिखलदरा १७,२७७, अमरावती ४८,३८२, भातकुली ३,८९४, नांदगाव खं. ६१,१७३, चांदूर रेल्वे ३९,१५७, तिवसा ३७,६९०, मोर्शी ५५,४४८, वरुड ४६,६४७, दर्यापूर ५८,९९१, अंजनगाव सुर्जी ४०,१४६, अचलपूर ३६,९८०, चांदूरबाजार ३६,९५१ व धामणगाव रेल्वे ५४,०२९ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. आतापर्यंत ५,३४० हेक्टर धान, १०,९६९ हेक्टर ज्वारी, १०,६६९ मका, १,१२,३४३ तूर्, १३,३८५ मूग, ४,६३३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. २० जुलैपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने यंदाच्या पेरण्या आटोपणार असल्याचे चित्र आहे.
बॉक्स
सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र
सद्यस्थितीत धारणी तालुक्यात ९,७४८ हेक्टर, चिखलदरा ६,१६६, अमरावती २६,९४५, भातकुली २५,४३५, नांदगाव ५४,६८१, चांदूर रेल्वे २३,६६१, तिवसा १६,०२५, मोर्शी १३,६०२, वरुड १,६३०, दर्यापूर १०,९५९, अंजनगाव सुर्जी १४,१६८, अचलपूर ८,०४७, चांदूरबाजार ११,७५२ व धामणगाव रेल्वे तालुक्यात २४,५३१ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झालेली आहे.
बॉक्स
कपाशीचीही क्षेत्रवाढ
आतापर्यंत धारणी तालुक्यात ८,५३९ हेक्टर, चिखलदरा १,८०५, अमरावती १३,६४०, भातकुली १०,२१५, नांदगाव ६,०४६, चांदूर रेल्वे ८,२८५, तिवसा १५,७७०, मोर्शी २५,५९२, वरुड २५,९४४, दर्यापूर २५,७९९, अंजनगाव सुर्जी १४,९५२, अचलपूर १७,८७१, चांदूरबाजार १५,१४६ व धामणगाव रेल्वे २१,०८७ हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी झालेली आहे.