शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास
3
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
4
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
5
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
6
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
7
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
8
Stock Market Opening: दिवाळीच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २४,२५० वर; सेन्सेक्सही वधारला
9
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
10
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
11
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
12
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
13
मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली; मराठा-ओबीसी लढत रंगणार
14
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
15
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
16
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
17
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
18
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
19
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
20
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!

खत्री कॉम्प्लेक्सप्रकरणी फौजदारी होणार

By admin | Published: September 06, 2015 12:03 AM

स्थानिक महापालिकेच्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी आयुक्तांच्या आदेशानुसार फौजदारी दाखल होणार आहे.

आयुक्तांचे आदेश : दोन महिन्यांच्या चौकशीनंतर निर्णयअमरावती : स्थानिक महापालिकेच्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी आयुक्तांच्या आदेशानुसार फौजदारी दाखल होणार आहे. बनावट करारनामे करुन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकूण ४० जणांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. बाजार व परवाना विभागाचे तत्कालीन अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल हे मुख्य आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत.खत्री कॉम्प्लेक्स हे महापालिकेने बीओटी तत्वावर साकारले असून बिल्डर्ससोबत १८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत करारनामा होता. मात्र, गंगाप्रसाद जयस्वाल यांनी सुनील खत्री, छुगाराम त्रिकोटी व अनुप खत्री या बिल्डर्ससोबत परस्पर करारनामा करुन एक रुपया फूटप्रमाणे हे संकूल करारनाम्याला मुदतवाढ दिली. या करारनाम्याला प्रशासनाची कोेणतीही परवानगी नव्हती. तरीरदेखील जयस्वाल यांनी महापालिकेला अंधारात ठेवून पुढील सन २०२० पर्यंत या करारनाम्याला मुदतवाढ दिली. बनावट करारनामे करताना जयस्वाल यांनी उपनिबंधक कार्यालयातून प्रतिज्ञापत्रदेखील लिहून दिले, हे विशेष. या संकुलात १८३ गाळे धारक असून पहिल्या टप्प्यात ४० गाळे धारकांचे बनावट करारनामे करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. परस्पर करारनामे ते देखील बनावट ही बाब अतीशय गंभीररीत्या प्रशासनाने घेतली आहे. दोन महिन्यांच्या चौकशीअंती कायदेशीर बाबी तपासून यात फौजदारी दाखल करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी घेतला आहे.