गाव होणार स्मार्ट : प्रवीण पोटे यांचा पुुढाकारमोर्शी : केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने आमदार आदर्श योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मोर्शी विधानसभा मतदार संघातील खेड गावाची निवड केली असल्याने आता साडेअकरा ज्योर्तिलींग असलेले खेड हे स्मार्ट बणणार आहे.मोर्शी मतदार संघातील खेडची लोकसंख्या पाच हजाराच्या आसपास आहे. आ. अनिल बोंडे यांच्या शिफारशीवरुन पालकमंत्र्यांनी आमदार आदर्श गाव योजनेसाठी या गावाची निवड केली. निवडीबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मोर्शीच्या तहसीलदारांची नियुक्ती नोडल आॅफीसर म्हणून करण्यात आली आहे. खेड गावाला आदर्श बनविण्यासाठी आता सर्वोतोपरी प्रयत्न चालविले जाणार आहे. या योजनेत निवड होणारे खेड हे तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे. ८ नोव्हेंबर रोजी ना. प्रवीण पोटे यांनी खेड प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटन प्रसंगी ही घोषणा केली होती. चारगड नदी तिरावर वसलेले खेड हे गाव साडे अकारा ज्योतिर्लींग असलेले गाव आहे. महानुभाव पंथीयांची अकरा धार्मिक स्थळे, वेताळेश्वर हे वार्षीक सभेचे ठिकाण, विस्तृत वनक्षेत्र व अमरावती-बैतुल या नजीकच्या मार्गाला जोडणारे हे गाव आहे. ग्रामविकास मंत्री आबासाहेब खेडकर यांचे जन्मगाव असलेले खेड हे विकासाच्या बाबतीत दुर्लक्षीत राहिले होते. भाजपाचे दिनेश शर्मा यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतमध्ये सत्ता मिळाल्यापासून या गावाच्या विकासाला गती देण्यात आली. आ. बोंडे यांच्यामार्फत राज्य शासनाकडे ३९ कोटी रुपयांचा खेड विकास आराखडा सादर करण्यात आणि आता दिनेश शर्मा व त्यांच्या चमूव्दारे चालविलेल्या प्रयत्नाने खेडला हा बहुमान प्राप्त झाला आहे. आदर्श गाव योजनेसाठी येथे पोषक वातावरण आहे. सर्व धर्मियनागरिकांमध्ये सलोख्याचे वातावरण असल्याचे दिनेश शर्मा यांनी सांगितले. अमरावती बैतुल मार्गे खेड या १२६ कि.मी. मार्गातील ६० किमी मार्ग दुपदरी करण्यात आल्यास खेड सर्व हा मार्ग नससंजीवनी ठरणार आहे. खेड फाट्यावर पॅसेंजर रेल्वेला थांबा देण्याचाही प्रयत्न होणार आहे.यावेळी सरपंच सविता भाष्कर जीरकार, अमिन उल्ला, विलास आघाडे, नंदकुमार निंभोकर, रामदास अघाडे, भुजंगराव चरपे, पी.एन. देशमुख, कल्पना देशमुख, श्रीकांत पावडे, अनिता नकरे उपस्थित होत्या.
आमदार आदर्श योजनेसाठी खेड गावाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 12:49 AM