लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यातील दुनी येथे एका युवतीला फोनवर बोलण्यास बाध्य करण्यासाठी १९ वर्षीय युवकाने तिच्या नऊ वर्षीय भावाची गळा दाबून हत्या केली. या बालकाचा मृतदेह पोटीलावा जंगलात मिळाला. धारणी पोलिसांनी युवकाला अटक केली असून, त्याने खुनाची कबुली दिली आहे.पोलीस सूत्रांनुसार, दुनी येथील रोशन नंदलाल कासदेकर (९) मृत मुलाचे नाव, तर रवि मोतीलाल जावरकर (१९ रा. पाटकहू) असे मारेकऱ्याचे नाव आहे. रविचे रोशनच्या बहिणीसोबत दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. त्याने तिला फोनवर बोलण्यासाठी तसेच प्रत्यक्ष बोलण्यासाठी दबाव टाकत, तसे न केल्यास रोशनला जिवे मारण्याची धमकी तीन दिवसांपूर्वी दिली होती. वर्ग तिसरीचा विद्यार्थी असलेल्या रोशनला त्याने बुधवारी शाळा सुटल्यावर दुपारी १२ वाजता वाटेत गाठले आणि बाइकवर बसवून पोटीलावा जंगलात नेले. तेथे रोशनची गळा दाबून हत्या केल्यानंतर रवि हा त्याच्या गावाकडे निघून गेला.दरम्यान मुलगा घरी न आल्याने नंदलाल कासदेकर व कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. कुठेही न मिळाल्याने अखेर धारणी पोलिसांत रात्री साडेनऊच्या सुमारास तक्रार दिली. तक्रारीत त्यांनी रवि जावरकर याच्याविरुद्ध संशय व्यक्त केला व मुलीला मिळालेल्या धमकीबाबत सांगितले. पोलिसांनी रविला गुरुवारी सकाळी ६ वाजता राहत्या घरून ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी धारणी ठाण्यात आणले. त्याने रोशनची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३६३, ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. धारणीचे एसडीपीओ पोलीस भरतीसाठी गेल्याने अंजनगाव येथील सुनील जायभाये यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहंदुले, सहायक निरीक्षक राजू चव्हाण, कर्मचारी बाबूलाल कासदेकर, अनुराग पाल, प्रभाकर डोंगरे, बालापुरे तपास करीत आहेत.रवि जावरकरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत.आरोपीने दिली खुनाची कबुली, ७ पर्यंत कोठडीरोशन होता हुशारतीन वर्षांपासून शाळेत असलेला रोशन हा कायम दुसऱ्या क्रमांकाने पास होत होता. यामुळे त्याच्या अपहरणाची माहिती मिळताच शिक्षक शालिनी पाखरे, राजदीप गुडधे, गोहलकर, योगिता उन्हाते यांनीही त्याचा शोध घेतला.
दुनी येथील नऊ वर्षीय मुलाचे अपहरण अन् हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 9:51 PM