शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

शिवसेनेच्या उमेदवारीसाठी तरुणाचे अपहरण

By admin | Published: February 06, 2017 12:03 AM

महापालिका निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी अन्य एका महिला पदाधिकाऱ्याच्या मुलाचे अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी उघड झाला.

वडाळी नाका परिसरातील घटना : फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलअमरावती : महापालिका निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी अन्य एका महिला पदाधिकाऱ्याच्या मुलाचे अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी उघड झाला. याप्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी वर्षा दिलीप भोयर यांच्या तक्रारीवरून प्रतिभा बोपशेट्टी, त्यांचा मुलगा बंटी (दोघेही राहणार महादेव खोरी) तसेच हेमंत कोडापे, पुनम कोडापे (दोन्ही राहणार वडाळी नाका) यांच्यासह दोन अज्ञातांविरुध्द गुन्हा नोंंदविला आहे. अपहरणाची ही घटना ३ फेबु्रवारीला सकाळी ९ ते दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वर्षा भोयर या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तथा शिवसेना महिला आघाडीच्या विद्यमान जिल्हाध्यक्षा आहेत. भोयर यांच्या तक्रारीनुसार, महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून ३ फेबु्रवारी रोजी त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर भोयर यांचा मुलगा आवेश (२०) याचे अपहरण करून त्याला वडाळी नाक्याजवळील एका खोलीत डांबून ठेवले. दरम्यान अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत आवेशने घर गाठले. तथा हा प्रकार त्याची आई वर्षा भोयर यांच्या कानावर घातला. रविवारी या घटनेची तक्रार फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३६३, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. २१ फेब्रवारीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी वर्षा भोयर यांनी एसआरपीएफ प्रभागातून शिवसेनेची उमेदवारी मागीतली होती. त्यांनी नामांकनही दाखल केले. ऐनवेळी बदलला उमेदवारअमरावती : शुक्रवारी दुपारी भोयर यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेचा बी फार्म प्रतिभा बोपशेट्टी यांना देण्यात आला. त्यामुळे भोयर यांची उमेदवारी अपक्ष म्हणून गणल्या गेली. बी फार्म वरून शुक्रवारी दुपारी अंबापेठ झोन कार्यालयात भोयर आणि बोपशेट्टी यांच्यात शाब्दिक वादही झाला होता. त्या पार्श्वभूमिवर भोयर यांनी दाखल केलेल्या तक्रारीने राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान याप्रकरणी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुनील खराटे यांच्यावर भोयर यांनी उमेदवारी कापल्याचा आरोप केला असून खराटे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. शिवसेनेच्या महानगर प्रमुखावर आरोपशिवसेनेचे महानगर प्रमुख सुनील खराटे यांनी आपल्याला कोरा बी फार्म दिला. शुक्रवारी दुपारी बी फार्म दाखल करतेवेळी ही बाब आपल्या लक्षात आली. शिवसेनेच्या स्थानिक नेत्तृत्वाला आपल्याऐवजी बोपशेट्टी यांनाच उमेदावारी द्यायची होती. हे बी फार्ममधील गोंधळाने स्पष्ट झाल्याचा आरोप वर्षा भोयर यांनी केला आहे. याबाबत आपण खा. अरविंद सावंत आणि खा. आनंद अडसुळ यांच्याकडे तक्रार करणार असल्याच्या भोयर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिवसेनेच्या उमेदवारीवरुन दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. वर्षा भोयर यांच्या तक्रारीवरुन आरोपी महिला पदाधिकाऱ्यांविरुध्द अपहरणाचा गुन्हा नोंदविला. चौकशीअंती अटकसत्र सुरु करण्यात येईल. - पंजाब वंजारी, पोलीस निरीक्षक, फे्रजरपुरा पोलीस ठाणे.