शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

‘आश्रमात किडनी रॅकेटची शक्यता’

By admin | Published: August 24, 2016 11:59 PM

पिंपळखुटा येथील संत शंकर महाराजांच्या आश्रमशाळेत घडलेला प्रकार निंदनीय तर आहेच.

पांडुरंग ढोलेंचे जाहीर सभेत रहस्योद्गार : शंकर महाराजांच्या अटकेसाठी चांदूररेल्वेत विशाल मोर्चाचांदूररेल्वे : पिंपळखुटा येथील संत शंकर महाराजांच्या आश्रमशाळेत घडलेला प्रकार निंदनीय तर आहेच. पण, या प्रकरणाची पाळेमुळे अतिशय खोलवर रुजलेली आहेत. आश्रमाची सीआयडी चौकशी केल्यास किडनी रॅकेट उघडकीस येऊ शकते, असे खळबळजनक रहस्योद्घाटन माजी आमदार पांडुरंग ढोले यांनी केले. प्रथमेश सगणे या चिमुरड्यावर नरबळीच्या उद्देशाने केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच आश्रम व्यवस्थापनावर कारवाईच्या प्रमुख मागणीसाठी बुधवारी आयोजित मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी बुधवारी चांदूूररेल्वे तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर विशाल मोर्चा काढण्यात आला. चांदूररेल्वे : पिंपळखुटा येथील संत शंकर महाराजांच्या आश्रमशाळेत घडलेला प्रकार निंदनीय तर आहेच. पण, या प्रकरणाची पाळेमुळे अतिशय खोलवर रुजलेली आहेत. आश्रमाची सीआयडी चौकशी केल्यास किडनी रॅकेट उघडकीस येऊ शकते, असे खळबळजनक रहस्योद्घाटन माजी आमदार पांडुरंग ढोले यांनी केले. प्रथमेश सगणे या चिमुरड्यावर नरबळीच्या उद्देशाने केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच आश्रम व्यवस्थापनावर कारवाईच्या प्रमुख मागणीसाठी बुधवारी आयोजित मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी बुधवारी चांदूूररेल्वे तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर विशाल मोर्चा काढण्यात आला. चांदूररेल्वे : नागपंचमीला अत्यंत क्रूर पद्धतीने संत शंकर महाराजांच्या आश्रमशाळेतील प्रथमेश सगणेचा गळा चिरण्यात आला. त्यानंतर हा प्रकार नरबळीचा असल्याचे स्पष्ट झाले. यथावकाश आरोपींनी देखील तशी कबुली दिली. परंतु इतके सगळे होऊनही याप्रकरणाशी संबंधित मुख्य आरोपी मात्र मोकाटच आहेत. म्हणूनच आश्रमशाळेचे संचालक शंकर महाराजांसह आणि व्यवस्थापनाची चौकशी करून मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी बुधवारी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांसह व्यापारी प्रतिष्ठानांनी बंदचे आवाहन केले होते. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. मोर्चात सहभागी होऊन विविध पक्ष, सामाजिक संघटनांनी या क्रूर घटनेबद्दल कठोर शब्दांत निषेध नोंदविला. सोबतच मातंग समाजाचे नेते बाळासाहेब सोरगिवकर यांनी शंकर महाराजांना तातडीने अटक करण्याची मागणी लाऊन धरली. आम आदमी पक्षाचे नेते नितीन गवळी, सोबतच दादासाहेब क्षीरसागर, शिवसेनेचे राजू निंबर्ते, युवा सेनेचे प्रकाश मारोडकर, लोकशाहीर धम्मा खडसे, भाजपचे उमेश भुजाडणे, मनसेचे रणजित पोटफोडे आदींनी कठोर शब्दांत निषेध करून आरोपींच्या अटकेची मागणी केली.यावेळी केशव वंजारी, संतोष वानखडे, गजानन गवई, लक्ष्मण लोखंडे, अशोक देशमुख, सुधाकर वानखडे, विनोद वानखडे, अजमतखाँ, श्रीकृष्ण कलाने, शोभा वानखडे, रेखा जोंधळे, अनुसया खंडारे, दुर्गा लोखंडे, मिना वानखडे, सुशिला लोखंडे, अनुसया सगळे, अलका खंडाळे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)नरबळीच्या उद्देशाने हल्ला झालेल्या अजयचा आईसह मोर्चात सहभागपिंपळखुटा येथील नरबळी प्रकरणाच्या निषेधार्थ चांदुर रेल्वे शहर बंद ठेवण्यात आले. यावेळी शहरातुन निघालेल्या सर्वपक्षीय बंदच्या मोर्च्यामध्ये पिंपळखुटा नरबळी प्रकरणात बळी ठरलेल्या तालुक्यातील धानोरा म्हाली येथील अजय वनवे व त्याची आई किरण वनवे ही सहभागी झाले होते. यावेळी किरण वनवे म्हणाल्या, नरबळीच्या हेतुने अजयवर हल्ला झाल्यानंतर आश्रमातर्फे आम्हाला कुठलीही मदत करण्यात आली नाही. आश्रमाकडून भेटीला सुध्दा कोणीही आले नाही. या हल्ल्यामागील मुख्य सुत्रधाराला लवकरात लवकर अटक करून आम्हाला न्याय देण्यात यावा. किरण वनवे यांनी आश्रमातील वनसतिगृहात त्यांचा मुलगा असताना त्याच्यावर झालेल्या जिवघेण्या हल्ल्याची तक्रार मंगरुळ पोलिसात दाखल केली आहे. त्याआधारे सुरेंद्र मराठे आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध नरबळीचा गुन्हा मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्यात नोदविण्यात आला आहे. हे तिघेही आश्रमाचे कर्मचारी होते. ‘लोकमत’ने या प्रकरणात शोधमोहिम आरंभल्यानंतर हे गुन्हे दाखल झालेत, हे उल्लेखनीय.