शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
2
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
3
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
4
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
5
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
6
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
7
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
8
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
9
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
11
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
12
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
13
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
14
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
15
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
16
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
17
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
18
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
19
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
20
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार

उमर, कन्हैयालालला फाशी द्या

By admin | Published: February 25, 2016 12:03 AM

‘कश्मीर हो या गुवाहाटी..अपना देश अपनी माटी.., देश के सम्मान में..हम सब मैदान में,’ अशा घोषणा देत वीर केसरी ....

दमदार नारेबाजी : वीर केसरी युवा प्रतिष्ठानच्या भारत एकता गौरव मार्चला प्रतिसादअमरावती : ‘कश्मीर हो या गुवाहाटी..अपना देश अपनी माटी.., देश के सम्मान में..हम सब मैदान में,’ अशा घोषणा देत वीर केसरी युवा प्रतिष्ठानद्वारे बुधवारी काढण्यात आलेल्या भारत एकता गौरव मार्चने जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला. उमर-कन्हय्याला फाशी देण्याची जोेरदार मागणी मोर्चेकऱ्यांनी यावेळी केली. पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त ठेवला होता.दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) ९ फेब्रुवारी रोजी घडलेल्या देशद्रोह प्रकरणाविरोधात हा मार्च काढण्यात आला होता. यात शेकडोे कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी, महिलांचा सहभाग होता. मोर्चेकऱ्यांनी पाकिस्तान विरोधी जोरदार नारेबाजी करुन देशद्रोही कारवाया करणाऱ्या उमर व कन्हय्याला फाशी देण्याची मागणी केली. कलेक्ट्रेट परिसरात या मार्चमुळे देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. वीर केसरी युवा प्रतिष्ठानचे संयोजक बादल कुळकर्णी यांनी मोर्चाचे नेतृत्त्व केले. स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. तिरंगा हाती घेऊन युवकांनी ‘भारत माता की जय’ अशा गगनभेदी घोषणा दिल्यात. या मार्चमध्ये युवकांचा लक्षणीय सहभाग होता. देशद्रोेही कारवायांमुळे प्रकाशात आलेली जेएनयू ही विद्यार्थी संघटना व ‘एयआयएसएस’ या देशद्रोही विद्यार्थी संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी युवकांनी रेटून धरली. देशविरोधी कृत्य करणे म्हणजे देशाच्या एकता, अखंडतेला बाधा पोहचविणे असल्यामुळे अशा कारवाया करणाऱ्यांना फाशीच झालीच पाहिजे, अशी एकच मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. मार्चमध्ये सहभागी युवकांचा आक्रोश आणि देशभक्तीचा जल्लोष बघून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बल, आरसीपी प्लॅटून बोलाविले होते. घटनास्थळी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके देखील पोहोचले होते. ‘जेएनयू’मध्ये झालेल्या देशद्रोही कृत्याचा विरोध करीत सर्वप्रकारच्या अभ्यासक्रमातील पुस्तकाच्या पहिल्या पानावर भारत मातेचे छायाचित्र अंकित करावे, या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांना देण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर, वीर केसरी युवा मार्चचे संयोजक बादल कुळकर्णी, कुणाल टिकले, आकाश वाघमारे, प्रणित सोनी, रितेश मुंधडा, दत्ता अंबोडे, भूषण हरकुट, अखिलेश राजपूत, निखील भटकर, सूरज जोशी, प्रितम ठाकूर, शंतनू भारतीय, अभिषेक दरांगे, प्रवीण मिश्रा, राज नागतोडे, विक्रम चांडक, आदर्श गोरे, रोहीत काळे, आदी उपस्थित होते.