अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा
दौऱ्यादरम्यान प्रकल्पग्रस्तांशी सुध्दा केली चर्चा
चांदूर रेल्वे : जागतिक सिकलसेल दिनी राज्यमंत्री दर्जा असलेले किशोर तिवारी यांनी घुईखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या घुईखेड दौऱ्यादरम्यान प्रकल्पग्रस्तांशीसुध्दा त्यांनी चर्चा केली.
कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) हे शनिवारी चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी दुपारी ४ वाजता घुईखेड प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांकडून कोरोना व इतर आरोग्य व्यवस्थेबाबत आढावा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्रांर्तगत येणारे उपकेंद्र याचीसुध्दा सविस्तर माहिती घेऊन कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेबद्दलही माहिती विचारली. यावेळी जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, तहसीलदार राजेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी थोरात, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रियंका निकोसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक तुमरेटी, डॉ. त्रिवेणी चांदने, तालुका लसीकरण सहनियंत्रण अधिकारी प्रणाली बोरडे, तालुका समूह संघटक मिनाक्षी चौधरी, विस्तार अधिकारी काळे, विस्तार अधिकारी दरुळी, क्षयरोग विभागाचे मनोहरे, कुष्ठरोग विभागाचे सुरवाडे, सिकलसेल विभागाचे पिंजरकर तथा सर्व हेल्थ वर्कर उपस्थित होते.
(बॉक्समध्ये घेणे)
खासदार, आमदार यांनीही केली पीएचसीची पाहणी
किशोर तिवारी यांच्या आढाव्यानंतर घुईखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला खासदार रामदास तडस व आमदार प्रताप अडसड यांनीसुध्दा सायंकाळी ५ वाजता भेट दिली व पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी चर्चा केली. यावेळी पंचायत समिती सभापती सरिता देशमुख, उपसभापती प्रतिभा डांगे, भाजपा माजी तालुका अध्यक्ष आशुतोष उर्फ पप्पू गुल्हाणे यांसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
===Photopath===
200621\img-20210620-wa0013.jpg
===Caption===
photo