आनंद, तसेच अनिल ऊर्फ अनिकेत जयश्रीराम सुरसाउत (२१, रा. पथ्रोड परतवाडा ह. मु. नमुना गल्ली) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी विजय जगन्नाथ बिलगये (३५, रा. जुनी चुनाभट्टी) यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३२६, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादी हे कामावरून सांगानी चौकातून घरी जात असताना रस्त्यात दोन्ही आरोपी घटनास्थळी उभे होते. त्यांनी क्षुल्लक कारणावरून फिर्यादीकडे रागाने बघितले. त्यानंतर शिवीगाळ करून नाकावर बुक्क्याने मारहण केली. यातील आरोपी अनिलने जवळचा चाकू काढून फिर्यादीच्या गालवार मारून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी जखमी अवस्थेत तेथून पळून गेला. त्यानंतर तो भावाला घेऊन आला. मात्र, भावावरसुद्धा चाकूने वार करून आरोपीने जखमी केले.
क्षुल्लक कारणावरून दोघांवर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:13 AM