शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कुलर लावताना जपा जीवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 1:29 AM

तापमान वाढल्याने कूलरचा वापर सुरू झाला आहे. कूलरचा शॉक लागून प्राणांतिक अपघात झाल्याच्या अनेक अप्रिय घटना दरवर्षी घडतात. त्यामुळे कुलर लावताना तसेच त्यात पाणी भरताना सुरक्षेची योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देसुरक्षेची योग्य खबरदारी आवश्यक : विद्युत प्रवाह सुरू असताना टाळा दुरुस्ती

धीरेंद्र चाकोलकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तापमान वाढल्याने कूलरचा वापर सुरू झाला आहे. कूलरचा शॉक लागून प्राणांतिक अपघात झाल्याच्या अनेक अप्रिय घटना दरवर्षी घडतात. त्यामुळे कुलर लावताना तसेच त्यात पाणी भरताना सुरक्षेची योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.सर्वप्रथम घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी. लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह येऊ नये, याकरिता कुलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी. कुलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी कुलरचा वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा व त्यानंतरच त्यात पाणी भरावे. कुलरच्या आतील वीज तार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करून घ्यावी. कूलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही, याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये. कूलरची वायर सदैव तपासून बघा. फायबर बाह्यभाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कूलरचा वापर प्राधान्याने करा. यामुळे अपघात टाळता येतील. दैनंदिन व्यस्ततेतून थोडासा वेळ या उपाययोजनांकरिता दिला, तर कुलरमुळे होणारे विजेचे अपघात मोठ्या प्रमाणात टळू शकतात. या उपाययोजनांची अंमलबजावणी करीत अप्रिय घटना टाळण्याचे आवाहन महावितरण अमरावती परिमंडळातर्फे करण्यात येत आहे.एलसीबीचा वापर कराकधी कुलरजवळ खेळताना विजेचा धक्का बसल्याने, तर कधी टिल्लू पंप सुरू करतेवेळी विजेचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना सातत्याने घडत असतात. ते टाळण्यासाठी ग्राहकांनी कुलरचा वापर सदैव थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात ‘अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स’ (एलसीबी) बसवून घ्यावे. विजेचा धक्का बसताच या उपकरणामुळे वीज प्रवाह खंडित होऊन पुढील अनर्थ टाळता येतो.प्रायमिंगबाबत ठेवा भानबरेचदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही व तो पंप एअर लॉक होतो. अशावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. बरेचदा ज्ञानाच्या अभावामुळे चालू पंपाचे प्रायमिंग केले जाते. त्यामुळे विजेचा शॉक लागण्याची शक्यता असल्याने चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे.विजेची बचत शक्यकूलरमधील पाण्याचा पंप पाच मिनिटे सुरू व १० मिनिटे बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिकल सर्किटचा वापर केल्यामुळे विजेचीही मोठ्या प्रमाणात बचत शक्य आहे. 

टॅग्स :electricityवीज