आॅनलाईन लोकमतअमरावती : रुक्मिणीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपुरातील यात्रा महोत्सवाची सांगता नुकतीच झाली. लाखोंची उलाढाल असल्याने येथे हजेरी लावणारे व्यावसायिक यंदा मात्र नाखूश दिसून आले. शेतकऱ्यांच्या हाती यंदा फारसे काही न लागल्यामुळे बाजारपेठेतही उत्साह दिसला नाही.काही वर्षांपूर्वी एक महिन्याच्या कौंडण्यपूर यात्रेत टूरिंग टॉकीज, आकाश पाळणे, सर्कस असायची. तमाशाचे फड रंगायचे. पाच ओळीत लागणारी दुकाने आता एकाच ओळीत संपतात. यात्रेत भाविक मोठ्या संख्येने असले तरी खरेदी होत नसल्यामुळे व्यावसायिकांची निराशा झाली आहे. यात्रेत आर्थिक उलाढाल येथे आलेल्या लोकांच्या प्रमाणात काहीच झाली नसल्याचे येथील व्यावसायिकांचे मत आहे.
उलाढाल फक्त शनिवार-रविवारी