अमरावती : कोंडेश्वर संस्थानातील सभागृह विनापरवानगी लग्न समारंभ सुरू असल्याप्रकरणी संबंधित संस्थानला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सभागृह सील करण्यात आले. महसूल विभागाच्या फिरत्या पथकाने ही कारवाई रविवारी दुपारी केली. कारवाईसाठी पथक धडकताच वऱ्हाडी मंडळींची पळापळ झाली, हे विशेष.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. त्यामुळे मंगल कार्यालये, लॉन कुलूपबंद, तर सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई आहे. यामुळे कठोर संचारबंदी कायम असतानाही लग्न समारंभासाठी हॉल दिल्याबाबत संस्थानला दोषी ठरवित कारवाई करण्यात आली. महसूल विभागाने दंड ठोठावण्यापूर्वी लग्न समारंभाचे छायाचित्रण, सभागृहात उपस्थित वऱ्हाडीदेखील कॅमेऱ्यात कैद केले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
----------------
कोंडेश्वर संस्थानला ३० हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. सभागृहदेखील सील करण्यात आले आहे. मंगल कार्यालयाला कधीपर्यंत सील असेल, हे निश्चित केले नाही.
- संतोष काकडे, तहसीलदार अमरावती.